S M L

पेंच प्रकल्पात 'त्या' वाघाची शिकार

21 जानेवारीविदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात तीन दिवसांपुर्वी मृत अवस्थेत आढळलेल्या वाघाची शिकार झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. देवलापार भागात पंजा आणि शीर नसलेल्या वाघाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर वनविभागाने गस्ती वाढवली होती. याप्रकरणी वनविभागाने संशयित म्हणून सात लोकांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून या वाघाची शिकार झाल्याचं उघड झालं. गेल्या आठवड्यामध्ये विदर्भात 5 जणांचा बळी घेणार्‍या एका नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. आणि त्यापाठोपाठ पेंचमध्ये वाघांचा मृत्यूमुळे वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पेंच अभयारण्यात तीन दिवसांपूर्वी वाघाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही माहिती स्थानिकांनी गस्तीवर असलेल्या अधिकार्‍यांनी कळवली होती. अभयारण्यात वाघाच्या मृत्यूची घटना घडते पण वन्य अधिकार्‍यांनाच माहिती नसते याबद्दल वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. 6 जानेवारीला ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढला होता तर 17 जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एक वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे वनविभागाला हादरा बसलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 12:03 PM IST

पेंच प्रकल्पात 'त्या' वाघाची शिकार

21 जानेवारी

विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात तीन दिवसांपुर्वी मृत अवस्थेत आढळलेल्या वाघाची शिकार झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. देवलापार भागात पंजा आणि शीर नसलेल्या वाघाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर वनविभागाने गस्ती वाढवली होती. याप्रकरणी वनविभागाने संशयित म्हणून सात लोकांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून या वाघाची शिकार झाल्याचं उघड झालं.

गेल्या आठवड्यामध्ये विदर्भात 5 जणांचा बळी घेणार्‍या एका नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. आणि त्यापाठोपाठ पेंचमध्ये वाघांचा मृत्यूमुळे वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पेंच अभयारण्यात तीन दिवसांपूर्वी वाघाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही माहिती स्थानिकांनी गस्तीवर असलेल्या अधिकार्‍यांनी कळवली होती. अभयारण्यात वाघाच्या मृत्यूची घटना घडते पण वन्य अधिकार्‍यांनाच माहिती नसते याबद्दल वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. 6 जानेवारीला ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढला होता तर 17 जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एक वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे वनविभागाला हादरा बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close