S M L

दहशतवादाचा बळी ठरली दोन निरपराध मुलं

5 डिसेंबर, मुंबईशिखा चौहानमुंबईतलं नरीमन पॉईंट आणि कुलाबा जेव्हा दहशतवादाच्या आगीत होरपळत होतं तेव्हा कित्येकजण आखो देखा हाल घरबसल्या पहात होते. 25 कीलोमीटर दूर असणार्‍या गोवंडीचं अन्सारी कुटुंब घडणारी प्रत्येक गोष्ट टीव्ही वर लाईव्ह पाहत होतं. आणि मनात आपलं कुटुंब सुरक्षित असल्याबद्दल समाधानी होतं. त्यांना कल्पनाही नव्हती की या दहशतवादाची झळ आपल्याला बसेल. या दहशतीची बळी ठरली दोन मुलं.तेरा वर्षाचा सलाउद्दीन आणि त्यांचा नऊ वर्षाचा भाऊ अलाउद्दीन हे दोघंही आपल्या आई वडिलांबरोबर घडणार्‍या घटना टि.व्ही वर बघत होते. हे अतिरेकी कोण आहेत ? कसे दिसतात? ,ते लोकांना का मारताहेत? ,त्यांना काय पाहीजे आहे ? असे प्रश्न वारंवार विचारत होते. पण त्यांच्या ह्या निरागस प्रश्नांची उत्तर त्यांच्या आई वडिलांकडे नव्हती. आणि म्हणूनच त्यानी उत्तर शोधण्यासाठी कुलाब्याला जायचा हट्ट केला."मुलांनी दहशतवाद्यांना बघण्याचा हट्ट धरला .मी त्याना समजवण्याचा प्रयत्न केला की ते आपल्यालाही मारुन टाकतील आणि बालहट्ट समजून त्यांच्या कडे दूर्लक्ष केलं" असं या मुलांचे वडील कमलूद्दीन अन्सारी यांनी सांगितलं. सलाउद्दीन आणि अलाउद्दीन दहशतवाद्यांना बघण्यासाठी 28 नोव्हेंबरला सकाळी घरातून निघाले, ते परतलेच नाहीत. आज पाच दिवस झालेत त्यांचा काहीच मागमूस नाही.कमलूद्दीननं मुलं हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली आणि हॉस्पिटलमध्येही जाऊन सर्व डेड बॉडिच बघितल्या पण दोघेही कुठेच मिळली नाहीत. ही मुलं कुठं गेली ? त्यांचं काय झालं ? याची काहीच कल्पना नाही. पण दहशतवाद्यांच्या दहशतीचा बळीही निरागस मुलं ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 07:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close