S M L

पराभवाचा काढला वचपा, भारताने मालिका जिंकली

23 जानेवारीकसोटी मालिकेत दारूण पराभवाला सामोरं गेलेल्या टीम इंडियाने अखेर वनडेत 'गोर्‍यासाहेबांना' धोबीपछाड देत मालिका जिंकली आहे.मोहाली इथं झालेल्या चौथी वन डे मॅच भारतानं इंग्लंडवर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर टीम इंडियानं 5 मॅचच्या सीरिजमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडनं भारतासमोर 258 रन्सचं आव्हान ठेवलं. पण याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ब्रेसननं गौतम गंभीरला 10 रन्सवर आऊट केलं आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर रोहीत शर्मा आणि विराट कोहलीनं संयमी खेळ करत स्कोर वाढवला. पण ट्रेडवेलनं विराट कोहली आणि युवराज सिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताला अजून दोन धक्के दिले. पण रोहीत शर्मानं आपला धडाका कायम ठेवला आणि शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. त्याला साथ दिली ती सुरेश रैनानं. रोहीत शर्मा 83 रन्स करून आऊट झाला. पण रैनानं आपला धडाका कायम ठेवला आणि धोणीच्या साथीनं स्कोरबोर्ड हलता ठेवला. पण धोणी 19 रन्स करुन आऊट झाला. तर रैनानही शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. पाच वन डेच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2013 02:30 PM IST

पराभवाचा काढला वचपा, भारताने मालिका जिंकली

23 जानेवारी

कसोटी मालिकेत दारूण पराभवाला सामोरं गेलेल्या टीम इंडियाने अखेर वनडेत 'गोर्‍यासाहेबांना' धोबीपछाड देत मालिका जिंकली आहे.मोहाली इथं झालेल्या चौथी वन डे मॅच भारतानं इंग्लंडवर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर टीम इंडियानं 5 मॅचच्या सीरिजमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडनं भारतासमोर 258 रन्सचं आव्हान ठेवलं. पण याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ब्रेसननं गौतम गंभीरला 10 रन्सवर आऊट केलं आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर रोहीत शर्मा आणि विराट कोहलीनं संयमी खेळ करत स्कोर वाढवला. पण ट्रेडवेलनं विराट कोहली आणि युवराज सिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताला अजून दोन धक्के दिले. पण रोहीत शर्मानं आपला धडाका कायम ठेवला आणि शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. त्याला साथ दिली ती सुरेश रैनानं. रोहीत शर्मा 83 रन्स करून आऊट झाला. पण रैनानं आपला धडाका कायम ठेवला आणि धोणीच्या साथीनं स्कोरबोर्ड हलता ठेवला. पण धोणी 19 रन्स करुन आऊट झाला. तर रैनानही शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. पाच वन डेच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2013 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close