S M L

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

25 जानेवारीमहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले आहे. नव्या बदलानुसार 1 मार्च रोजी आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर 4 मार्चला होणार आहे. तर 4 मार्च रोजी आर्टच्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्सचा पेपर आता 17 मार्चला होणार आहे अशी माहिती शिक्षण मंडळाने दिलीय. या नव्याबदलामुळे गणिताच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 6 दिवसांचा अधिक वेळ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. जीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चला आणि रसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला होणार आहे. बारावीचा सायन्स आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या धर्तीवर बदलण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. सायन्स-गणित सारख्या अवघड विषयांसाठी 1 दिवसाचे अंतर चार ते पाच दिवस असावी अशी मागणी पालकांनी केली होती. पालकांच्या या तक्रारीची दखल घेऊन शिक्षणखात्याने हा निर्णय घेतला आहे. बारावीच्या वेळापत्रकात बदल- 1 मार्चचा गणिताचा पेपर 4 मार्चला होणार- 4 मार्चचा इकॉनॉमिक्सचा पेपर आता 17 मार्चला होणारसायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल जीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चलारसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2013 02:37 PM IST

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

25 जानेवारी

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले आहे. नव्या बदलानुसार 1 मार्च रोजी आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर 4 मार्चला होणार आहे. तर 4 मार्च रोजी आर्टच्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्सचा पेपर आता 17 मार्चला होणार आहे अशी माहिती शिक्षण मंडळाने दिलीय. या नव्याबदलामुळे गणिताच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 6 दिवसांचा अधिक वेळ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. जीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चला आणि रसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला होणार आहे. बारावीचा सायन्स आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या धर्तीवर बदलण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. सायन्स-गणित सारख्या अवघड विषयांसाठी 1 दिवसाचे अंतर चार ते पाच दिवस असावी अशी मागणी पालकांनी केली होती. पालकांच्या या तक्रारीची दखल घेऊन शिक्षणखात्याने हा निर्णय घेतला आहे.

बारावीच्या वेळापत्रकात बदल

- 1 मार्चचा गणिताचा पेपर 4 मार्चला होणार- 4 मार्चचा इकॉनॉमिक्सचा पेपर आता 17 मार्चला होणार

सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

जीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चलारसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2013 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close