S M L

शिवसेनेचा बालेकिल्ल्यात बंडाळी

16 जानेवारीशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यामध्येच शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीला सुरूवात झालीय. कुठे संपर्कनेत्यांवर नाराज तर कुठे निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला सारलं जात असल्यानं अनेक जण आपला वेगळा मार्ग शोधत आहेत. नाराजीचा हा सूर लक्षात घेता शिवसेनेनी आपला मोर्चा आता मराठवाड्याकडे वळवलाय. निमित्त असणार आहे, ते दुष्काळ मोर्चाचं. नाशिक आणि कोल्हापूरमधील शिवसेना कार्यकर्त्यांचं बंड लक्षात घेऊन आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील शिवसैनिकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये एकसंघ राहण्याचा आणि सरकारविरुध्द दुष्काळाचा लढा देण्यासाठी सज्ज राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं. मात्र उघडपणे व्यासपीठावर कोणतेही नेते बंडाळीवर बोलायला तयार झाले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेतील नाराजाना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2013 01:46 PM IST

शिवसेनेचा बालेकिल्ल्यात बंडाळी

16 जानेवारी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यामध्येच शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीला सुरूवात झालीय. कुठे संपर्कनेत्यांवर नाराज तर कुठे निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला सारलं जात असल्यानं अनेक जण आपला वेगळा मार्ग शोधत आहेत. नाराजीचा हा सूर लक्षात घेता शिवसेनेनी आपला मोर्चा आता मराठवाड्याकडे वळवलाय. निमित्त असणार आहे, ते दुष्काळ मोर्चाचं. नाशिक आणि कोल्हापूरमधील शिवसेना कार्यकर्त्यांचं बंड लक्षात घेऊन आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील शिवसैनिकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये एकसंघ राहण्याचा आणि सरकारविरुध्द दुष्काळाचा लढा देण्यासाठी सज्ज राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं. मात्र उघडपणे व्यासपीठावर कोणतेही नेते बंडाळीवर बोलायला तयार झाले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेतील नाराजाना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2013 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close