S M L

मनसेच्या कामगार मेळाव्यामुळे एसटीला 'ब्रेक'

10 जानेवारीदरवर्षीप्रमाणे होणार्‍या मनसेच्या राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार मेळाव्यामुळे मंडळाला मोठा फटका बसलाय. या मेळाव्याला हजर राहण्यासाठी जवळपास 30 हजार चालक आणि वाहन सामूहिक रजेवर गेल्यानं अनेक ठिकाणी एसटी सेवा ठप्प झाली आहेत. मुंबईत मनसेच्या एसटी कामगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 30 हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहकांनी 10 ते 12 जानेवारी अशी तीन दिवस सामूहिक रजा टाकली आहे. यामुळे राज्यात एसटी सेवा कोलमडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर आज सकाळपासूनच एसटीच्या 128 फेर्‍या रद्द करण्यात आल्याचं समजतंय. काही तालुक्यांमध्ये एसटी सेवा ठप्प आहे. तर नाशिकमधून 4 हजार कर्मचार्‍यांनी सुटीसाठी अर्ज केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2013 11:03 AM IST

मनसेच्या कामगार मेळाव्यामुळे एसटीला 'ब्रेक'

10 जानेवारी

दरवर्षीप्रमाणे होणार्‍या मनसेच्या राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार मेळाव्यामुळे मंडळाला मोठा फटका बसलाय. या मेळाव्याला हजर राहण्यासाठी जवळपास 30 हजार चालक आणि वाहन सामूहिक रजेवर गेल्यानं अनेक ठिकाणी एसटी सेवा ठप्प झाली आहेत. मुंबईत मनसेच्या एसटी कामगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 30 हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहकांनी 10 ते 12 जानेवारी अशी तीन दिवस सामूहिक रजा टाकली आहे. यामुळे राज्यात एसटी सेवा कोलमडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर आज सकाळपासूनच एसटीच्या 128 फेर्‍या रद्द करण्यात आल्याचं समजतंय. काही तालुक्यांमध्ये एसटी सेवा ठप्प आहे. तर नाशिकमधून 4 हजार कर्मचार्‍यांनी सुटीसाठी अर्ज केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2013 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close