S M L

दिल्ली गँगरेप प्रकरणाचा खटला आजपासून फास्ट ट्रॅक कोर्टात

21 जानेवारीदिल्लीत 16 डिसेंबरला झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला आजपासून फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. आजपासून या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सहा जणांना अटकेत आहे. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवला जाणार आहे. पण एका वकिलानं अल्पवयीन आरोपीचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवण्यास विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलीये. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता या आरोपीला अल्पवयीन गृहीत धरु नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीये. सुप्रीम कोर्टानं यावर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना याबाबत नोटीस बजावलीये. तर खटला दिल्लीबाहेर हलवण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 12:23 PM IST

दिल्ली गँगरेप प्रकरणाचा खटला आजपासून फास्ट ट्रॅक कोर्टात

21 जानेवारी

दिल्लीत 16 डिसेंबरला झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला आजपासून फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. आजपासून या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सहा जणांना अटकेत आहे. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवला जाणार आहे. पण एका वकिलानं अल्पवयीन आरोपीचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवण्यास विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलीये. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता या आरोपीला अल्पवयीन गृहीत धरु नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीये. सुप्रीम कोर्टानं यावर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना याबाबत नोटीस बजावलीये. तर खटला दिल्लीबाहेर हलवण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close