S M L

सावकारशाहीविरोधात शेतकर्‍यांचा लढा

01 फेब्रुवारीराज्यात खाजगी सावकारीविरुध्द सरकारनं कितीही कारवाईचे दावे केले तरी अजूनही सावकारी सुरूच आहे. या सावकारी पाशात अडकलेत अपंग शेतकरी राजेश खडकेंनी 10 हजारांसाठी त्यांनी त्यांची जमीन गहाण ठेवली. पण सावकराने ती जमिनी परस्पर विक्री केल्यामुळे खडकेंना मोठा धक्का बसला आहे. आपली जमीन परत मिळावी म्हणून त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आव्हाणे शिवारात असलेल्या राजेश खडके यांच्या शेतजमिनीतून नवीन फोर लेन जातोय. त्यामुळे या जमिनीला चांगलीच किंमत आली आहे. जमिनेचे भाव वाढल्यामुळे, सावकारांनी त्यांची जमीन परस्पर विकल्याचा आरोप खडकेंनी केला आहे. अवघ्या 10 हजारासाठी खाजगी सावकाराकडे गहाण ठेवलेल्या शेतजमिनीची,सावकारानं परस्पर विक्री केल्याचं खडके यांचा आरोप आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या जमिनीची अपूर्ण आणि खोटी कागदपत्र तलाठ्यानं सावकारास तयार करून दिली. शेतकरी राजेश खडके यांनी कोर्टाने दिलेल्या इंडेक्स 2 ची नोंदही तलाठ्यानं 7/12 उतार्‍यावर नोंदवली नाही. यामुळेच जमिनीची परस्पर विक्री खाजगी सावकार सुनिल बोरोले,सुरेश केशवानी यांना महसूलच्या अधिकार्‍यांनी मदत केल्याचा आरोप खडके यांनी केला आहे. लोकशाही दिनी अनेकवेळा तक्रार देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्याची खंत हे अपंग शेतकरी राजेश खडके यांना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2013 10:50 AM IST

सावकारशाहीविरोधात शेतकर्‍यांचा लढा

01 फेब्रुवारी

राज्यात खाजगी सावकारीविरुध्द सरकारनं कितीही कारवाईचे दावे केले तरी अजूनही सावकारी सुरूच आहे. या सावकारी पाशात अडकलेत अपंग शेतकरी राजेश खडकेंनी 10 हजारांसाठी त्यांनी त्यांची जमीन गहाण ठेवली. पण सावकराने ती जमिनी परस्पर विक्री केल्यामुळे खडकेंना मोठा धक्का बसला आहे. आपली जमीन परत मिळावी म्हणून त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

आव्हाणे शिवारात असलेल्या राजेश खडके यांच्या शेतजमिनीतून नवीन फोर लेन जातोय. त्यामुळे या जमिनीला चांगलीच किंमत आली आहे. जमिनेचे भाव वाढल्यामुळे, सावकारांनी त्यांची जमीन परस्पर विकल्याचा आरोप खडकेंनी केला आहे. अवघ्या 10 हजारासाठी खाजगी सावकाराकडे गहाण ठेवलेल्या शेतजमिनीची,सावकारानं परस्पर विक्री केल्याचं खडके यांचा आरोप आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या जमिनीची अपूर्ण आणि खोटी कागदपत्र तलाठ्यानं सावकारास तयार करून दिली. शेतकरी राजेश खडके यांनी कोर्टाने दिलेल्या इंडेक्स 2 ची नोंदही तलाठ्यानं 7/12 उतार्‍यावर नोंदवली नाही. यामुळेच जमिनीची परस्पर विक्री खाजगी सावकार सुनिल बोरोले,सुरेश केशवानी यांना महसूलच्या अधिकार्‍यांनी मदत केल्याचा आरोप खडके यांनी केला आहे. लोकशाही दिनी अनेकवेळा तक्रार देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्याची खंत हे अपंग शेतकरी राजेश खडके यांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2013 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close