S M L

मुख्यमंत्र्यांचा 12 फेब्रुवारीपासून दुष्काळी दौरा

08 फेब्रुवारीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आता दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. 12 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 12 तारखेलाच औरंगाबादमध्ये यासंदर्भातील आढावा बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे एक दिवस आधी, म्हणजे 11 तारखेला शरद पवारही तिथेच वेगळी आढावा बैठक घेणार आहे. दरम्यान, युवक काँग्रेसही मागे नाही. तेही 11 फेब्रुवारी पासून दुष्काळग्रस्त भागात पायी दिंडी काढणार आहे. बुलढाण्यातून सुरू होणारी ही दिंडी नंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून सांगलीत संपणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2013 12:54 PM IST

मुख्यमंत्र्यांचा 12 फेब्रुवारीपासून दुष्काळी दौरा

08 फेब्रुवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आता दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. 12 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 12 तारखेलाच औरंगाबादमध्ये यासंदर्भातील आढावा बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे एक दिवस आधी, म्हणजे 11 तारखेला शरद पवारही तिथेच वेगळी आढावा बैठक घेणार आहे. दरम्यान, युवक काँग्रेसही मागे नाही. तेही 11 फेब्रुवारी पासून दुष्काळग्रस्त भागात पायी दिंडी काढणार आहे. बुलढाण्यातून सुरू होणारी ही दिंडी नंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून सांगलीत संपणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2013 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close