S M L

पुण्याचा आराखडा बिल्डारांच्या घशात घालण्याचा प्रकार-देसाई

11 जानेवारीपुण्याचा विकास आराखडा म्हणजे अख्खं पुणं बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार असुन त्याविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहे. त्याबरोबरच शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी आराखड्याच्या विरोधात मतदान केलं नाही त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. पुण्याचा विकास आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेने मंजूर केला. हा बिल्डरांचा आराखडा आहे अशी टीका या आराखड्यावर होतेय. त्यामुळे शिवसेनेने आता या आराखड्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्याविषयी पुण्यामध्ये आज शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हा विकास आराखडा जर प्रत्यक्षात आला तर पुण्यात परप्रातियांचे लोंढे वाढतील. हा प्रकार पुण्यामध्ये होऊ देणार नाही. या आराखड्याला शक्य त्या प्रत्येक मार्गाने विरोध करु असं ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2013 04:47 PM IST

पुण्याचा आराखडा बिल्डारांच्या घशात घालण्याचा प्रकार-देसाई

11 जानेवारी

पुण्याचा विकास आराखडा म्हणजे अख्खं पुणं बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार असुन त्याविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहे. त्याबरोबरच शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी आराखड्याच्या विरोधात मतदान केलं नाही त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. पुण्याचा विकास आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेने मंजूर केला. हा बिल्डरांचा आराखडा आहे अशी टीका या आराखड्यावर होतेय. त्यामुळे शिवसेनेने आता या आराखड्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्याविषयी पुण्यामध्ये आज शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हा विकास आराखडा जर प्रत्यक्षात आला तर पुण्यात परप्रातियांचे लोंढे वाढतील. हा प्रकार पुण्यामध्ये होऊ देणार नाही. या आराखड्याला शक्य त्या प्रत्येक मार्गाने विरोध करु असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2013 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close