S M L

'रणजी'त मुंबईची फायनलमध्ये धडक

21 जानेवारीमुंबईनं रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहेत. सेमीफायनलमध्ये मुंबईनं सेनादलाचा पराभव केलाय. मॅचचे 3 दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे सहाव्या आणि राखीव दिवशी मॅचचा निकाल लागला. मॅच जिंकण्यासाठी सेनादलाला आघाडी घेणं गरजेचं होतं. तर मुंबईला सेनादलाच्या 7 विकेट घ्यायच्या होत्या. मुंबईच्या बॉलर्सनं आपली दमदार कामगिरी करत सेनादलाच्या टीमला 240 रन्समध्ये ऑलआऊट केलं. पाचव्या दिवसाअखेर सेनादलानं 3 विकेट गमावत 164 रन्स केले होते. पण मुंबईनं फक्त 54 रन्समध्ये सेनादलाच्या उर्वरीत 7 विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीनं मुंबईतर्फे सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूरनं 62 रन्समध्ये 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई आता तब्बल 44 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहेत. 26 जानेवारीपासून मुंबई विरुद्ध सौराष्ट्र या फायनलला सुरुवात होणार आहे..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 12:27 PM IST

'रणजी'त मुंबईची फायनलमध्ये धडक

21 जानेवारी

मुंबईनं रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहेत. सेमीफायनलमध्ये मुंबईनं सेनादलाचा पराभव केलाय. मॅचचे 3 दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे सहाव्या आणि राखीव दिवशी मॅचचा निकाल लागला. मॅच जिंकण्यासाठी सेनादलाला आघाडी घेणं गरजेचं होतं. तर मुंबईला सेनादलाच्या 7 विकेट घ्यायच्या होत्या. मुंबईच्या बॉलर्सनं आपली दमदार कामगिरी करत सेनादलाच्या टीमला 240 रन्समध्ये ऑलआऊट केलं. पाचव्या दिवसाअखेर सेनादलानं 3 विकेट गमावत 164 रन्स केले होते. पण मुंबईनं फक्त 54 रन्समध्ये सेनादलाच्या उर्वरीत 7 विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीनं मुंबईतर्फे सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूरनं 62 रन्समध्ये 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई आता तब्बल 44 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहेत. 26 जानेवारीपासून मुंबई विरुद्ध सौराष्ट्र या फायनलला सुरुवात होणार आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close