S M L

नितीन गडकरींची आयकर खात्यात 'हजेरी'

01 जानेवारीभाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता मात्र खुद्द गडकरी यांनीच इन्कम टॅक्सच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. नितीन गडकरी हे 1 फेब्रुवारीला आयकर खात्याच्या ऑफिसमध्ये हजर होणार होते. पण गुरूवारी रात्री त्यांनी आयटी इन्वेस्टीगेशन्सच्या डायरेक्टर गीता रविचंद्रन यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी चौकशी केली आहे. पूर्ती कंपनीतल्या गैरव्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी केली. चार तास ही चौकशी चालली. नितीन गडकरी यांना शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी जायचं असल्यानं त्यांनी गुरूवारीच आयकर अधिकार्‍यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2013 11:28 AM IST

नितीन गडकरींची आयकर खात्यात 'हजेरी'

01 जानेवारी

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता मात्र खुद्द गडकरी यांनीच इन्कम टॅक्सच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. नितीन गडकरी हे 1 फेब्रुवारीला आयकर खात्याच्या ऑफिसमध्ये हजर होणार होते. पण गुरूवारी रात्री त्यांनी आयटी इन्वेस्टीगेशन्सच्या डायरेक्टर गीता रविचंद्रन यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी चौकशी केली आहे. पूर्ती कंपनीतल्या गैरव्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी केली. चार तास ही चौकशी चालली. नितीन गडकरी यांना शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी जायचं असल्यानं त्यांनी गुरूवारीच आयकर अधिकार्‍यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2013 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close