S M L

गायिका एस.जानकींनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार

26 जानेवारीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देण्यात आलेल्या प्रतिष्ठेचे पद्म पूरस्कारावरून आता वाद निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य पार्श्वगायिका श्रीराममुर्ती जानकी यांनी त्यांना जाहीर झालेला पद्मभुषण पुरस्कार नाकारला आहे. आपल्याला देण्यात आलेला हा पुरस्कार फारच उशीरा जाहीर झाल्यामुळे पद्मपुरस्कार आपण नाकारत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जानकी यांना वयाच्या 74 वर्षीय पुरस्कार देण्यात आलाय. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत 15 हजारांच्या वर गाणी गाणार्‍या जानकी यांनी सर्व दाक्षिणात्य भाषांसह काही हिंदी गाणीही गायली आहेत. मागिल वर्षी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यावरून ही वाद रंगला होता. आता जानकी यांनी पाच दशकं गायन क्षेत्रात योगदान देऊन त्यांना 74 व्या वर्षी पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2013 10:22 AM IST

गायिका एस.जानकींनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार

26 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देण्यात आलेल्या प्रतिष्ठेचे पद्म पूरस्कारावरून आता वाद निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य पार्श्वगायिका श्रीराममुर्ती जानकी यांनी त्यांना जाहीर झालेला पद्मभुषण पुरस्कार नाकारला आहे. आपल्याला देण्यात आलेला हा पुरस्कार फारच उशीरा जाहीर झाल्यामुळे पद्मपुरस्कार आपण नाकारत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जानकी यांना वयाच्या 74 वर्षीय पुरस्कार देण्यात आलाय. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत 15 हजारांच्या वर गाणी गाणार्‍या जानकी यांनी सर्व दाक्षिणात्य भाषांसह काही हिंदी गाणीही गायली आहेत. मागिल वर्षी सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यावरून ही वाद रंगला होता. आता जानकी यांनी पाच दशकं गायन क्षेत्रात योगदान देऊन त्यांना 74 व्या वर्षी पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2013 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close