S M L

अखेर 6 ऐवजी 9 सिलिंडर मिळणार

17 जानेवारीमहागाईने वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिलाय. सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या 6 वरुन 9 करण्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलंय. एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहितेचा प्रश्न येत नसल्यानं हा निर्णय लागू करण्यास हरकत घेतली नसल्याच निवडणूक आयोगानं सांगितलंय. आणखी दिलासादायक बातमी म्हणजे एलपीजीच्या किंमतीतही वाढ करण्यात येणार नाही अशी माहिती पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी दिली आहे. तसंच पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या किंमतीही नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. मोईली यांनी खासगी कंपन्या येत्या काही काळात डिझेलचे दर काहीप्रमाणात ठरवू शकतील असं सांगितलंय. पण सध्या कोणतीही दरवाढ करणार नसल्याचं मोईलींनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2013 10:03 AM IST

अखेर 6 ऐवजी 9 सिलिंडर मिळणार

17 जानेवारी

महागाईने वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिलाय. सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या 6 वरुन 9 करण्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलंय. एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहितेचा प्रश्न येत नसल्यानं हा निर्णय लागू करण्यास हरकत घेतली नसल्याच निवडणूक आयोगानं सांगितलंय. आणखी दिलासादायक बातमी म्हणजे एलपीजीच्या किंमतीतही वाढ करण्यात येणार नाही अशी माहिती पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी दिली आहे. तसंच पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या किंमतीही नियंत्रणमुक्त होण्याची शक्यता आहे. मोईली यांनी खासगी कंपन्या येत्या काही काळात डिझेलचे दर काहीप्रमाणात ठरवू शकतील असं सांगितलंय. पण सध्या कोणतीही दरवाढ करणार नसल्याचं मोईलींनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close