S M L

ढोबळेंची बदली राजकीय हस्तक्षेपामुळेच -अजित पवार

15 जानेवारीएसीपी वसंत ढोबळे यांच्या तडकाफडकी बदलीवरून आता राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झालीये. ढोबळे यांच्या बदलीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. तर त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनीही या प्रकरणी भूमिका घेतल्यानं आता ढोबळेंचं बदली प्रकरण ऐरणीवर आलंय. वसंत ढोबळेंच्या बदलीला विरोध करत त्यांची बदली करण्याच्या निर्णयाचा शिवसेना आणि मनसेनं निषेध केलाय. या दोन विरोधी पक्षांनंतर आता सरकारमधूनही या बदलीविरोधात आवाज ऐकू यायला लागलाय. ढोबळेंची ही बदली फेरीवाल्यांच्या दबावामुळे नाही तर स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या दबावामुळे झाली अशी शंका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. कर्तव्य बजावणार्‍या एका अधिकार्‍याला राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून हटवल्यामुळे जनतेमध्येही रोष आहे. एकूणच या बदलीवरून राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस यांना घेरायला सुरुवात केलीये. त्यामुळे वसंत ढोबळेंच्या बदलीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपणार असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2013 10:28 AM IST

ढोबळेंची बदली राजकीय हस्तक्षेपामुळेच -अजित पवार

15 जानेवारी

एसीपी वसंत ढोबळे यांच्या तडकाफडकी बदलीवरून आता राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झालीये. ढोबळे यांच्या बदलीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. तर त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनीही या प्रकरणी भूमिका घेतल्यानं आता ढोबळेंचं बदली प्रकरण ऐरणीवर आलंय. वसंत ढोबळेंच्या बदलीला विरोध करत त्यांची बदली करण्याच्या निर्णयाचा शिवसेना आणि मनसेनं निषेध केलाय. या दोन विरोधी पक्षांनंतर आता सरकारमधूनही या बदलीविरोधात आवाज ऐकू यायला लागलाय. ढोबळेंची ही बदली फेरीवाल्यांच्या दबावामुळे नाही तर स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या दबावामुळे झाली अशी शंका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. कर्तव्य बजावणार्‍या एका अधिकार्‍याला राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून हटवल्यामुळे जनतेमध्येही रोष आहे. एकूणच या बदलीवरून राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस यांना घेरायला सुरुवात केलीये. त्यामुळे वसंत ढोबळेंच्या बदलीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close