S M L

शिक्षक अधिवेशनावर, विद्यार्थी वार्‍यावर

08 जानेवारीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे होणार्‍या शिक्षक अधिवेशनासाठी मुलांना वार्‍यावर सोडून उस्मानाबाद जिल्ह्यातून 3000 हजार शिक्षक जाणार असा अंदाज शिक्षक संघटना करीत आहेत या अधिवेशनासाठी राज्यभरातून शिक्षक हजेरी लावत असतात. गेल्या वर्षी पण शाळांना दांडी मारून शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यामुळे 52 शिक्षकांवर जिल्हा परिषदेमार्फत कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा या वर्षी शिक्षक जाणार आहेत. या साठी शिक्षकांनी रजा सुध्दा टाकल्या आहेत. या जागेवर पर्यायी व्यवस्था म्हणून डी एड कॉलेजचे विद्यार्थी नेमण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत सांगण्यात आले आहे. शाळा ओस, विद्यार्थ्यांना सुट्टीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये शिक्षकांचं अधिवेशन होतंय. राज्यभरातील हजारो शिक्षक शाळांमध्ये रजा टाकून या अधिवेशनासाठी हजर राहणार आहेत. त्यामुळे शाळा ओस पडल्यात. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना आठ दिवसांची सुट्टीही जाहीर केलीय. या सगळ्यात विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय.राज्यातल्या ग्रामीण भागातल्या बहुतांश शाळा ओस पडल्यात. कारण आहे शिक्षकांच्या ओरोसमध्ये होणार्‍या अधिवेशनाचं. राज्यातल्या हजारो शिक्षकांनी अधिवेशनाला जाताना मुलांना मात्र वार्‍यावर सोडलंय. आठ दिवसांची रजा टाकून बहुतांश शिक्षकांनी शाळेला दांडी मारलीय. त्यामुळे शाळेत हजर असलेल्या एखाद दोन शिक्षकांनाच शाळा चालवावी लागतेय.अधिवेशनासाठी शाळेला दांडी मारणार्‍या शिक्षकांना आता छड्या बसण्याची शक्यता आहे. शाळेतल्या 50 टक्के पेक्षा जास्त शिक्षक अधिवेशनाला गेल्यास त्यांची चौकशी होईल असं ग्रामविकास मंत्र्यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर काही शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली सहलीला गेल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. पण शिक्षक संघटनांनी मात्र शिक्षकांवरचे आरोप फेटाळून लावलेत. स्वत:चे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडण्याचा चुकीचा धडा शिक्षक गिरवतातयत आणि त्याकडं सरकारही डोळेझाक करतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 12:00 PM IST

शिक्षक अधिवेशनावर, विद्यार्थी वार्‍यावर

08 जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे होणार्‍या शिक्षक अधिवेशनासाठी मुलांना वार्‍यावर सोडून उस्मानाबाद जिल्ह्यातून 3000 हजार शिक्षक जाणार असा अंदाज शिक्षक संघटना करीत आहेत या अधिवेशनासाठी राज्यभरातून शिक्षक हजेरी लावत असतात. गेल्या वर्षी पण शाळांना दांडी मारून शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्यामुळे 52 शिक्षकांवर जिल्हा परिषदेमार्फत कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा या वर्षी शिक्षक जाणार आहेत. या साठी शिक्षकांनी रजा सुध्दा टाकल्या आहेत. या जागेवर पर्यायी व्यवस्था म्हणून डी एड कॉलेजचे विद्यार्थी नेमण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत सांगण्यात आले आहे.

शाळा ओस, विद्यार्थ्यांना सुट्टी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये शिक्षकांचं अधिवेशन होतंय. राज्यभरातील हजारो शिक्षक शाळांमध्ये रजा टाकून या अधिवेशनासाठी हजर राहणार आहेत. त्यामुळे शाळा ओस पडल्यात. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना आठ दिवसांची सुट्टीही जाहीर केलीय. या सगळ्यात विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय.

राज्यातल्या ग्रामीण भागातल्या बहुतांश शाळा ओस पडल्यात. कारण आहे शिक्षकांच्या ओरोसमध्ये होणार्‍या अधिवेशनाचं. राज्यातल्या हजारो शिक्षकांनी अधिवेशनाला जाताना मुलांना मात्र वार्‍यावर सोडलंय. आठ दिवसांची रजा टाकून बहुतांश शिक्षकांनी शाळेला दांडी मारलीय. त्यामुळे शाळेत हजर असलेल्या एखाद दोन शिक्षकांनाच शाळा चालवावी लागतेय.

अधिवेशनासाठी शाळेला दांडी मारणार्‍या शिक्षकांना आता छड्या बसण्याची शक्यता आहे. शाळेतल्या 50 टक्के पेक्षा जास्त शिक्षक अधिवेशनाला गेल्यास त्यांची चौकशी होईल असं ग्रामविकास मंत्र्यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर काही शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली सहलीला गेल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. पण शिक्षक संघटनांनी मात्र शिक्षकांवरचे आरोप फेटाळून लावलेत. स्वत:चे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडण्याचा चुकीचा धडा शिक्षक गिरवतातयत आणि त्याकडं सरकारही डोळेझाक करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close