S M L

रक्षक बनला भक्षक;तक्रार घेण्याऐवजी तिला मारहाण

12 जानेवारीअन्यायाविरूध्द दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलेल्या तरूणीला पोलीस अधिकार्‍यानेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आपल्या होणार्‍या पतीसह ही पीडित तरूणी शिर्डीला जात असताना, तीची गाडी थांबली होती. त्याच दरम्यान चौघांनी तीचे अपहरण केलं आणि धुळ्याजवळ शिरपूरच्या कुंटणखाण्यात तिची विक्री केली. तीथून या तरूणीने कशीबशी स्वत:ची सुटका केली. तिथून तिने आपल्या पतीसह अहमदनगर गाठलं. त्यानंतर ही तरूणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेली असताना, ऍडिशनल एसपी संजय बारकुंड यांनी तीची तक्रार तर नोंदवली नाहीच पण तीला शिवीगाळ करत मारहाण केली. स्टेशनमध्ये पीडित तरूणीला ना ना प्रश्न विचारले. तुझ्यासोबत काय झालंय ? तुझे परिवार सुद्धा याच धंद्यातले आहे. खरं खरं सांग तुझी गँग कुठे आहे ? असं विचारत या तरूणीला लाथाबुक्याने, पट्‌ट्याने मारहाण करण्यात आली असं या तरूणींनं सांगितलं. पीडित तरूणीच्या पतीलाही बारकुंड यांनी पट्‌ट्याने मारहाण केली. जर आमच्याविरोधात तक्रार दाखल केली तर याद राखा अशी धमकी ही दिली. या प्रकारनंतर घाबरलेल्या या दाम्पत्याने पुणे गाठलं. आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारबाबत पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण या तक्रारीत तरूणीने काय म्हटलंय हे सांगण्यास मात्र पोलीस नकार दिलाय. तिचा कबुलीजबाब एका बंद लिफ्यात अहमदनगरच्या पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय अशी माहिती पीआय शिवाजी कांबळे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2013 09:57 AM IST

रक्षक बनला भक्षक;तक्रार घेण्याऐवजी तिला मारहाण

12 जानेवारी

अन्यायाविरूध्द दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलेल्या तरूणीला पोलीस अधिकार्‍यानेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आपल्या होणार्‍या पतीसह ही पीडित तरूणी शिर्डीला जात असताना, तीची गाडी थांबली होती. त्याच दरम्यान चौघांनी तीचे अपहरण केलं आणि धुळ्याजवळ शिरपूरच्या कुंटणखाण्यात तिची विक्री केली. तीथून या तरूणीने कशीबशी स्वत:ची सुटका केली. तिथून तिने आपल्या पतीसह अहमदनगर गाठलं.

त्यानंतर ही तरूणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेली असताना, ऍडिशनल एसपी संजय बारकुंड यांनी तीची तक्रार तर नोंदवली नाहीच पण तीला शिवीगाळ करत मारहाण केली. स्टेशनमध्ये पीडित तरूणीला ना ना प्रश्न विचारले. तुझ्यासोबत काय झालंय ? तुझे परिवार सुद्धा याच धंद्यातले आहे. खरं खरं सांग तुझी गँग कुठे आहे ? असं विचारत या तरूणीला लाथाबुक्याने, पट्‌ट्याने मारहाण करण्यात आली असं या तरूणींनं सांगितलं.

पीडित तरूणीच्या पतीलाही बारकुंड यांनी पट्‌ट्याने मारहाण केली. जर आमच्याविरोधात तक्रार दाखल केली तर याद राखा अशी धमकी ही दिली. या प्रकारनंतर घाबरलेल्या या दाम्पत्याने पुणे गाठलं. आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारबाबत पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पण या तक्रारीत तरूणीने काय म्हटलंय हे सांगण्यास मात्र पोलीस नकार दिलाय. तिचा कबुलीजबाब एका बंद लिफ्यात अहमदनगरच्या पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय अशी माहिती पीआय शिवाजी कांबळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2013 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close