S M L

माजी कामगारमंत्री साबीरभाईंना मदतीचा हात

21 जानेवारीज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी कामगारमंत्री साबीर शेख विपन्नावस्थेत जगत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. या बातमीची दखल घेऊन औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमानं त्यांना मदतीचा हात दिलाय. कल्पतरू युवा मंचाचे अध्यक्ष संजय तांबे यांनी पुढाकार घेऊन साबीरभाईंची औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहेत. एकेकाळी मराठवाड्यात पालकमंत्री असलेले साबीर भाई आता अनेक वर्षांनी औरंगाबादमध्ये गेले आहे. ठाण्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी साबीर भाईंना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण वास्तवात मात्र कुणीही पुढे आलं नाही. पण ते आता गेले मातोश्री वृद्धाश्रमात राहण्यासाठी. आयबीएन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर काही शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावुन आले. त्यांना तात्पुरती मदतही केली. मात्र त्यांची पुर्ण वेळ काळजी घ्यायला कोणी नसल्यानं त्यांनी वृद्धाश्रमात हलवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या पत्नीचं निधन झालंय. तर एकुलत्या एक मुलीचं लग्न झालंय. घरी काळजी घेणार कोणी नाही. त्यातचं साबीरभाईंच आजारपण.. समाजासाठी वाहुन घेणार्‍या साबीरभाईंनी स्वतासाठी काही कमावलं नाही. त्यामुळे उपचारांचा खर्चही त्यांना झेपणं कठीणं झालं होतं. त्यामुळे आता साबीरभाईंची पुर्ण जबाबदारी कल्पतरु मंचनं घेतलीये आणि मातोश्री वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 12:42 PM IST

माजी कामगारमंत्री साबीरभाईंना मदतीचा हात

21 जानेवारी

ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी कामगारमंत्री साबीर शेख विपन्नावस्थेत जगत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. या बातमीची दखल घेऊन औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमानं त्यांना मदतीचा हात दिलाय. कल्पतरू युवा मंचाचे अध्यक्ष संजय तांबे यांनी पुढाकार घेऊन साबीरभाईंची औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहेत.

एकेकाळी मराठवाड्यात पालकमंत्री असलेले साबीर भाई आता अनेक वर्षांनी औरंगाबादमध्ये गेले आहे. ठाण्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी साबीर भाईंना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण वास्तवात मात्र कुणीही पुढे आलं नाही. पण ते आता गेले मातोश्री वृद्धाश्रमात राहण्यासाठी. आयबीएन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर काही शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावुन आले. त्यांना तात्पुरती मदतही केली. मात्र त्यांची पुर्ण वेळ काळजी घ्यायला कोणी नसल्यानं त्यांनी वृद्धाश्रमात हलवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या पत्नीचं निधन झालंय. तर एकुलत्या एक मुलीचं लग्न झालंय. घरी काळजी घेणार कोणी नाही. त्यातचं साबीरभाईंच आजारपण.. समाजासाठी वाहुन घेणार्‍या साबीरभाईंनी स्वतासाठी काही कमावलं नाही. त्यामुळे उपचारांचा खर्चही त्यांना झेपणं कठीणं झालं होतं. त्यामुळे आता साबीरभाईंची पुर्ण जबाबदारी कल्पतरु मंचनं घेतलीये आणि मातोश्री वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close