S M L

26/11 हल्ल्यात शौर्य गाजणार्‍या 4 अधिकार्‍यांच्या गौरव

01 मार्चमुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवलेल्या 4 अधिकार्‍यांना आता पराक्रम पदकानं सन्मानित करण्यात आले आहे. 26/11 च्या हल्याच्या वेळी सदानंद दाते आणि इतर अधिकार्‍यांनी कसाब आणि त्याच्या साथिदाराचा मुकाबला केला होता. त्यांच्या या शौर्याची दखल घेत आता दातेंसह इतर तीन पोलीस अधिकार्‍यांना पराक्रम पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पराक्रम पदक हे पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकार्‍यांना दिलं गेलंय. केंद्र सरकारतर्फे हे पदक 1973 सालापासून दिल जातं. हे पदक बहाल करण्याचा अधिकार राज्याच्या पोलीस महासंचालकांना असतो. आपल्या अधिकाराचा वापर करत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी या चार बहाद्दर अधिकार्‍यांची या पदकासाठी शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केली. आणि यानंतर लवकरच या चौघांना हे पदक दिलं जाणार आहे. 26/11 च्या हल्ल्याच्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हत्याकांड केल्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार अबु इस्माईल हे दोघे कामा हॉस्पिटल मध्ये घुसले होते.त्या ठिकाणी हि त्यांना रक्तपात करायचा होता. मात्र, त्यांना तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि इतर कर्मचार्‍यांनी प्रत्युतर दिलं होतं. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या हँण्डग्रेनेडच्या हल्यात दाते यांच्या सहसहाय्यक पोलीस निरिक्षक विजय शिंदे, पोलीस शिपाई सचिन टिळेकर हे जखमी झाले. तर विजय साळकर, अशोक कामटे, हेमंत करकरे यांच्यावर कसाब आणि त्याच्या साथिदारांनी हल्ला केला तेव्हा साळसकर यांच्या सोबत गाडीत असलेले अरुण जाधव हे देखील जखमी झाले होते. या चौघांच्या शौर्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यांना पराक्रम पदकाने सन्मानित केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2013 04:14 PM IST

26/11 हल्ल्यात शौर्य गाजणार्‍या 4 अधिकार्‍यांच्या गौरव

01 मार्च

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवलेल्या 4 अधिकार्‍यांना आता पराक्रम पदकानं सन्मानित करण्यात आले आहे. 26/11 च्या हल्याच्या वेळी सदानंद दाते आणि इतर अधिकार्‍यांनी कसाब आणि त्याच्या साथिदाराचा मुकाबला केला होता. त्यांच्या या शौर्याची दखल घेत आता दातेंसह इतर तीन पोलीस अधिकार्‍यांना पराक्रम पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पराक्रम पदक हे पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकार्‍यांना दिलं गेलंय. केंद्र सरकारतर्फे हे पदक 1973 सालापासून दिल जातं. हे पदक बहाल करण्याचा अधिकार राज्याच्या पोलीस महासंचालकांना असतो. आपल्या अधिकाराचा वापर करत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी या चार बहाद्दर अधिकार्‍यांची या पदकासाठी शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केली. आणि यानंतर लवकरच या चौघांना हे पदक दिलं जाणार आहे.

26/11 च्या हल्ल्याच्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हत्याकांड केल्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार अबु इस्माईल हे दोघे कामा हॉस्पिटल मध्ये घुसले होते.त्या ठिकाणी हि त्यांना रक्तपात करायचा होता. मात्र, त्यांना तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि इतर कर्मचार्‍यांनी प्रत्युतर दिलं होतं. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या हँण्डग्रेनेडच्या हल्यात दाते यांच्या सहसहाय्यक पोलीस निरिक्षक विजय शिंदे, पोलीस शिपाई सचिन टिळेकर हे जखमी झाले. तर विजय साळकर, अशोक कामटे, हेमंत करकरे यांच्यावर कसाब आणि त्याच्या साथिदारांनी हल्ला केला तेव्हा साळसकर यांच्या सोबत गाडीत असलेले अरुण जाधव हे देखील जखमी झाले होते. या चौघांच्या शौर्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यांना पराक्रम पदकाने सन्मानित केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2013 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close