S M L

अमळनेरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू

01 फेब्रुवारीअमळनेर शहर अवैध धंद्यांनी पुन्हा चर्चेत आले आहे. शहरात पोलिसांच्या नाकाखाली अवैध दारू धंदे, सट्टा,मटका आणि जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहे. याविरोधात स्थानिक आमदारानं दाखल केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यानं पोलिसांचाच या अवैध धंद्यांना आशिर्वाद आहे का असा आरोप होतोय. शहरातील दगडी दरवाजा परिसरातून शहरातील सर्व प्रमुख रस्ते जात असल्यानं पोलिसांची गस्त या भागात नेहमी असते. पण राजरोसपणे सुरू असलेल्या या मटक्याच्या पेढी मात्र पोलिसांना दिसत नाहीत का असा सवाल विचारला जातोय. याबाबत पोलिसांना विचारणा केली तर पोलिसांनी मात्र प्रतिक्रीया द्यायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2013 12:18 PM IST

अमळनेरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू

01 फेब्रुवारी

अमळनेर शहर अवैध धंद्यांनी पुन्हा चर्चेत आले आहे. शहरात पोलिसांच्या नाकाखाली अवैध दारू धंदे, सट्टा,मटका आणि जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहे. याविरोधात स्थानिक आमदारानं दाखल केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यानं पोलिसांचाच या अवैध धंद्यांना आशिर्वाद आहे का असा आरोप होतोय. शहरातील दगडी दरवाजा परिसरातून शहरातील सर्व प्रमुख रस्ते जात असल्यानं पोलिसांची गस्त या भागात नेहमी असते. पण राजरोसपणे सुरू असलेल्या या मटक्याच्या पेढी मात्र पोलिसांना दिसत नाहीत का असा सवाल विचारला जातोय. याबाबत पोलिसांना विचारणा केली तर पोलिसांनी मात्र प्रतिक्रीया द्यायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2013 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close