S M L

मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले

27 फेब्रुवारीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेलं वाक्ययुद्ध आता गुद्दा-गुद्दीवर आले आहे. अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर हल्ले केले आहे. हिंगोलीत पदाधिकार्‍यांच्या घरांवर दगडफेक केली गेली आहे. तर यवतमाळमध्ये एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. जशात तसं उत्तर देण्याची मनसेनं भाषा केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी पुण्यात पाय ठेवून दाखवावं असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलं आहे.त्याचपाठोपाठ आज पुण्यात राष्ट्रवादीनं मनसेविरुद्ध मोर्चाही काढला. तर ही कार्यकर्त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा मनसेनं केला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला आहे. या प्रकरणी मनसे आमदार वसंत गीतेंसह 35 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेकराज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर अनेकवेळा विखारी टीका केली. याच कारणावरून काल अहमदनगरमध्ये गेलेल्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच दोन्ही बाजूनं दगडफेकही सुरू झाली. यात दोन कार्यकर्ते जखमी झालेत.या प्रकरणी बिंगार पोलिसांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह 77 कार्यकर्त्यावर दंगलीचा आरोप केला आहे. तर मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांच्यासह 7 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.कार्यालयावर हल्लेया प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात तीव्र स्वरुपात उमटले आहे. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचं कार्यालय काही अज्ञात व्यक्तींनी फोडलं आहे. हे मनसेचे कार्यकर्ते असण्याचा संशय व्यक्त केला जातोय. यानंतर महापालिकेबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच चेंबुर, सायन, मुलुंड, गिरगाव, पुणे इथं राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले आहे. या घटनानंतर पुण्यात राष्ट्रवादीने मनसेविरुद्ध मोर्चाही काढला आहे. तसंच अंबरनाथमध्ये आज मनसेनं बंद पुकारला आहे. त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. (बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2013 10:05 AM IST

मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले

27 फेब्रुवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेलं वाक्ययुद्ध आता गुद्दा-गुद्दीवर आले आहे. अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर हल्ले केले आहे. हिंगोलीत पदाधिकार्‍यांच्या घरांवर दगडफेक केली गेली आहे. तर यवतमाळमध्ये एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. जशात तसं उत्तर देण्याची मनसेनं भाषा केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी पुण्यात पाय ठेवून दाखवावं असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलं आहे.त्याचपाठोपाठ आज पुण्यात राष्ट्रवादीनं मनसेविरुद्ध मोर्चाही काढला. तर ही कार्यकर्त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा मनसेनं केला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला आहे. या प्रकरणी मनसे आमदार वसंत गीतेंसह 35 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक

राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर अनेकवेळा विखारी टीका केली. याच कारणावरून काल अहमदनगरमध्ये गेलेल्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच दोन्ही बाजूनं दगडफेकही सुरू झाली. यात दोन कार्यकर्ते जखमी झालेत.या प्रकरणी बिंगार पोलिसांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांच्यासह 77 कार्यकर्त्यावर दंगलीचा आरोप केला आहे. तर मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांच्यासह 7 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.

कार्यालयावर हल्ले

या प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात तीव्र स्वरुपात उमटले आहे. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचं कार्यालय काही अज्ञात व्यक्तींनी फोडलं आहे. हे मनसेचे कार्यकर्ते असण्याचा संशय व्यक्त केला जातोय. यानंतर महापालिकेबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच चेंबुर, सायन, मुलुंड, गिरगाव, पुणे इथं राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले आहे. या घटनानंतर पुण्यात राष्ट्रवादीने मनसेविरुद्ध मोर्चाही काढला आहे. तसंच अंबरनाथमध्ये आज मनसेनं बंद पुकारला आहे. त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

(बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2013 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close