S M L

कर्जमाफी घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर

06 मार्चदिल्ली :यूपीएच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेसंदर्भातला कॅगचा अहवाल सरकारने काल संसदेत मांडला. याचे पडसाद आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. विरोधकांच्या अत्यंत आक्रमक भूमिकेनंतर खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच चर्चेत हस्तक्षेप करावा लागला. या गैरव्यवहारात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. संसदेचं आजचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उचलला. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाजही काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार इतकं असंवेदनशील आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा कठोर शब्दात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर तोफ डागली. पण, नियमाप्रमाणे या अहवालाची लोकलेखा समितीमध्ये छाननी होऊ द्या. त्यानतंर जो कुणी दोषी आढळेल त्यावर तातडीनं कारवाई करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. शिवाय, कॅगच्या अहवालावर स्वतंत्र चर्चा घेण्याची मागणीही पंतप्रधानांनी मान्य केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 04:38 PM IST

कर्जमाफी घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर

06 मार्च

दिल्ली :यूपीएच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेसंदर्भातला कॅगचा अहवाल सरकारने काल संसदेत मांडला. याचे पडसाद आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. विरोधकांच्या अत्यंत आक्रमक भूमिकेनंतर खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच चर्चेत हस्तक्षेप करावा लागला. या गैरव्यवहारात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. संसदेचं आजचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उचलला. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाजही काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार इतकं असंवेदनशील आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा कठोर शब्दात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर तोफ डागली. पण, नियमाप्रमाणे या अहवालाची लोकलेखा समितीमध्ये छाननी होऊ द्या. त्यानतंर जो कुणी दोषी आढळेल त्यावर तातडीनं कारवाई करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. शिवाय, कॅगच्या अहवालावर स्वतंत्र चर्चा घेण्याची मागणीही पंतप्रधानांनी मान्य केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close