S M L

नाशिक पालिकेच्या सभेत विरोधकांचा गोंधळ

17 जानेवारीएलईडी दिव्यांच्या खरेदीवरून नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांनी गोंधळ घातला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पीठासनावर धाव घेतली. आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शहरात 70 हजार स्ट्रीट लाईटस् बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एमआयसी कंपनीनं 5 वर्षांसाठी 205 कोटींच्या निविदा पाठवल्या आहेत. मुळात 137 कोटींच्या कामासाठी जास्तीची निविदा येणं आणि त्यासाठीची प्रक्रियाही स्पर्धात्मक न होता एकाच कंपनीची येणं यामुळे या व्यवहारात संशयाचा धूर निघू लागलाय. याबाबत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेनं केली. पण, महापौरांनी लेखी सूचनेसाठी ती मान्य न केल्यानं विरोधकांनी सभेत गोंधळ घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2013 10:15 AM IST

नाशिक पालिकेच्या सभेत विरोधकांचा गोंधळ

17 जानेवारी

एलईडी दिव्यांच्या खरेदीवरून नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांनी गोंधळ घातला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पीठासनावर धाव घेतली. आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शहरात 70 हजार स्ट्रीट लाईटस् बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एमआयसी कंपनीनं 5 वर्षांसाठी 205 कोटींच्या निविदा पाठवल्या आहेत. मुळात 137 कोटींच्या कामासाठी जास्तीची निविदा येणं आणि त्यासाठीची प्रक्रियाही स्पर्धात्मक न होता एकाच कंपनीची येणं यामुळे या व्यवहारात संशयाचा धूर निघू लागलाय. याबाबत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेनं केली. पण, महापौरांनी लेखी सूचनेसाठी ती मान्य न केल्यानं विरोधकांनी सभेत गोंधळ घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2013 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close