S M L

कर्जमाफीच्या नावाखाली फस्त केले 112 कोटी

06 फेब्रुवारीकोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफी घोटाळ्याबाबत आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ, कागल, कुरुंदवाडमधल्या मूठभर लोकांना 112 कोटींची खिरापत मिळाल्याचं उघड झालं आहे. या घोटाळ्यामध्ये कागल तालुक्यातल्या अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि राजकीय क्षेत्रातले नेते यांनीच कर्जमाफीचा लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. पीककर्ज, लोकरी-माव्याचे कर्ज आणि पूरकर्ज अशा तीन प्रकारच्या कर्जांमार्फत फायदा उचलण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना कर्जमाफीचा लाभ झालाय. याप्रकरणात संशयाची सुई कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळतेय. पण, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2013 04:29 PM IST

कर्जमाफीच्या नावाखाली फस्त केले 112 कोटी

06 फेब्रुवारी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कर्जमाफी घोटाळ्याबाबत आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ, कागल, कुरुंदवाडमधल्या मूठभर लोकांना 112 कोटींची खिरापत मिळाल्याचं उघड झालं आहे. या घोटाळ्यामध्ये कागल तालुक्यातल्या अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि राजकीय क्षेत्रातले नेते यांनीच कर्जमाफीचा लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. पीककर्ज, लोकरी-माव्याचे कर्ज आणि पूरकर्ज अशा तीन प्रकारच्या कर्जांमार्फत फायदा उचलण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना कर्जमाफीचा लाभ झालाय. याप्रकरणात संशयाची सुई कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळतेय. पण, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2013 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close