S M L

पुण्यात मद्यधुंद गुंडांचा धुमाकूळ

09 मार्चपुणे : येथील चंद्रभागा हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 8 गुंडांनी दारुच्या नशेत धुमाकूळ घातला. भारती विद्यापीठ परिसरात दत्तनगरमध्ये ही घटना घडली आहे. नियमानुसार रात्री बारा वाजेनंतर दारू बारमध्ये सर्व्ह करता येत नाही. त्यामुळे दारू देण्यास हॉटेल वेटरने नकार दिल्याचा राग येऊन या गुंडानी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलीसही त्याठिकाणी पोहचले. पण पोलिसांना धक्काबुक्की करत हे गुंड बाहेर पडले. दारु न दिल्याचा राग येऊन त्या हॉटेलच्या बाहेरील कॉलनीतील 26 चार चाकी वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं आहे. या आठ गुडांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तर सात जण फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2013 10:42 AM IST

पुण्यात मद्यधुंद गुंडांचा धुमाकूळ

09 मार्च

पुणे : येथील चंद्रभागा हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 8 गुंडांनी दारुच्या नशेत धुमाकूळ घातला. भारती विद्यापीठ परिसरात दत्तनगरमध्ये ही घटना घडली आहे. नियमानुसार रात्री बारा वाजेनंतर दारू बारमध्ये सर्व्ह करता येत नाही. त्यामुळे दारू देण्यास हॉटेल वेटरने नकार दिल्याचा राग येऊन या गुंडानी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलीसही त्याठिकाणी पोहचले. पण पोलिसांना धक्काबुक्की करत हे गुंड बाहेर पडले. दारु न दिल्याचा राग येऊन त्या हॉटेलच्या बाहेरील कॉलनीतील 26 चार चाकी वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं आहे. या आठ गुडांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तर सात जण फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2013 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close