S M L

यंत्रमाग कामगारांचा संपामुळे 900 कोटींची उलाढाल ठप्प

30 जानेवारीकोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमधला यंत्रमाग कामगारांचा संप अजूनही सुरुच आहे. गेले 9 दिवस सगळे यंत्रमाग बंद असल्यानं तब्बल 900 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. निश्चित वेतन मिळावं या मागणीसाठी गेले काही दिवस यंत्रमाग कामगारांनी बंद पुकारलाय. या आंदोलनामध्ये कॉम्रेड नरसय्या आडमही सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत आडम यांनी सरकावर टीका करत यंत्रमाग कामगारांना असा बंद पुकारा की मुख्यमंत्र्यांना इचलकरंजीत यावं लागेल असं आवाहन केलं. मात्र यंत्रमाग कामगार संघटना कृती समिती आणि यंत्रमागधारक आपापल्या मागण्यांवर ठाम असल्यानं या आंदोलनाबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 12:37 PM IST

यंत्रमाग कामगारांचा संपामुळे 900 कोटींची उलाढाल ठप्प

30 जानेवारी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमधला यंत्रमाग कामगारांचा संप अजूनही सुरुच आहे. गेले 9 दिवस सगळे यंत्रमाग बंद असल्यानं तब्बल 900 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. निश्चित वेतन मिळावं या मागणीसाठी गेले काही दिवस यंत्रमाग कामगारांनी बंद पुकारलाय. या आंदोलनामध्ये कॉम्रेड नरसय्या आडमही सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत आडम यांनी सरकावर टीका करत यंत्रमाग कामगारांना असा बंद पुकारा की मुख्यमंत्र्यांना इचलकरंजीत यावं लागेल असं आवाहन केलं. मात्र यंत्रमाग कामगार संघटना कृती समिती आणि यंत्रमागधारक आपापल्या मागण्यांवर ठाम असल्यानं या आंदोलनाबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close