S M L

निवासी डॉक्टरांच्या लाक्षणिक संपामुळे रूग्णांचे हाल

24 जानेवारीराज्यातील निवासी डॉक्टरांनी आज लाक्षणिक संप पुकारला आहे. 2009 च्या जीआरनुसार निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दर तीन वर्षांनी वाढ करावी. बाँण्डच्या अंमलबजावणीतील त्रूटी दूर कराव्यात यावी अशा मागण्या डॉक्टारांनी केल्या आहेत. आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा मार्डनं दिलाय. डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील जेजे हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल ,सायन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटलवर परिणाम झालाय. मार्डचे या चारही हॉस्पिटलमध्ये 2 हजार डॉक्टर आहेत. ते आज काम करणार नाहीत. त्यामुळे ओपीडी ऑपरेशन बंद असणार असून फक्त इमरजन्सी असेल तर ऑपरेशन होणार असल्याचं संघटनेनी भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या या संपामुळे मात्र रूग्णांना हाल सहन करावे लागत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 10:10 AM IST

निवासी डॉक्टरांच्या लाक्षणिक संपामुळे रूग्णांचे हाल

24 जानेवारी

राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज लाक्षणिक संप पुकारला आहे. 2009 च्या जीआरनुसार निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दर तीन वर्षांनी वाढ करावी. बाँण्डच्या अंमलबजावणीतील त्रूटी दूर कराव्यात यावी अशा मागण्या डॉक्टारांनी केल्या आहेत. आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा मार्डनं दिलाय. डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील जेजे हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल ,सायन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटलवर परिणाम झालाय. मार्डचे या चारही हॉस्पिटलमध्ये 2 हजार डॉक्टर आहेत. ते आज काम करणार नाहीत. त्यामुळे ओपीडी ऑपरेशन बंद असणार असून फक्त इमरजन्सी असेल तर ऑपरेशन होणार असल्याचं संघटनेनी भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या या संपामुळे मात्र रूग्णांना हाल सहन करावे लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close