S M L

'दगडफेक पूर्वनियोजित होती'

27 फेब्रुवारीअहमदनगरमध्ये झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय करणार होते हे पोलिसांना माहित होते पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. ऐनप्रसंगी जेंव्हा दगडफेक होत होती मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? का बघ्याची भूमिका घेतली असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच मी पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही. कोणीही माझा आवाज दाबू शकत नाही. राज्य सरकारने झालेला प्रकार लक्ष्यात घ्यावा. खबरदारी म्हणून आता राज्य सरकार जालन्याच्या सभेला परवानगी देणार नाही अशी नेहमीच पद्धत आहे. पण त्यांनी सभेला परवानगी नाकारूनच दाखवावं असं आव्हानही राज यांनी दिलंय. या संपूर्ण प्रकरणावर जालन्याच्या सभेत योग्य उत्तर देऊ असंही राज यांनी स्पष्ट केलं. आज राज ठाकरे नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही 'ऑफ द रेकॉर्ड' प्रतिक्रिया दिली.दरम्यान, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहे. राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आहे. मुंबई,पुणेसह राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीने निषेध आहे. पण नगरमध्ये झालेल्या दगडफेक हे राष्ट्रवादीचे कृत्य नाही. मनसे ही नवनिर्माण सेना नसून गुंड निर्माण सेना झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी केली आहे. तर या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल आणि त्यांना हातात दगड घ्यावे. त्यांना जर एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावे मग बघा त्यांचे महाराष्ट्रात काय हाल होतात. असा इशारा राष्ट्रवादीला देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतली आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे दोन मार्चला जालन्यातील सभेत बोलणार आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला ) संबंधित बातम्या================================================== मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक उद्धव ठाकरेंनी घेतली राजची बाजू जशाच तसे उत्तर देऊ -राम कदम मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले =================================================

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2013 11:52 AM IST

'दगडफेक पूर्वनियोजित होती'

27 फेब्रुवारी

अहमदनगरमध्ये झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय करणार होते हे पोलिसांना माहित होते पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. ऐनप्रसंगी जेंव्हा दगडफेक होत होती मग पोलिसांनी कारवाई का केली नाही ? का बघ्याची भूमिका घेतली असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच मी पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही. कोणीही माझा आवाज दाबू शकत नाही. राज्य सरकारने झालेला प्रकार लक्ष्यात घ्यावा. खबरदारी म्हणून आता राज्य सरकार जालन्याच्या सभेला परवानगी देणार नाही अशी नेहमीच पद्धत आहे. पण त्यांनी सभेला परवानगी नाकारूनच दाखवावं असं आव्हानही राज यांनी दिलंय. या संपूर्ण प्रकरणावर जालन्याच्या सभेत योग्य उत्तर देऊ असंही राज यांनी स्पष्ट केलं. आज राज ठाकरे नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही 'ऑफ द रेकॉर्ड' प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहे. राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आहे. मुंबई,पुणेसह राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीने निषेध आहे. पण नगरमध्ये झालेल्या दगडफेक हे राष्ट्रवादीचे कृत्य नाही. मनसे ही नवनिर्माण सेना नसून गुंड निर्माण सेना झाली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी केली आहे.

तर या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल आणि त्यांना हातात दगड घ्यावे. त्यांना जर एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावे मग बघा त्यांचे महाराष्ट्रात काय हाल होतात. असा इशारा राष्ट्रवादीला देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतली आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे दोन मार्चला जालन्यातील सभेत बोलणार आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

संबंधित बातम्या

==================================================

मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक उद्धव ठाकरेंनी घेतली राजची बाजू जशाच तसे उत्तर देऊ -राम कदम मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले

=================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2013 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close