S M L

एक नजर भुजबळांच्या कारकीर्दीवर

5 डिसेंबर मुंबईआर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवे उपमुख्यमंत्री म्हणून बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या व्हिजेटीआय इंजिनियरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा भुजबळांनी केला. 1966 साली भुजबळ शिवसेनेचे माझगाव मधले पहिले शाखा प्रमुख झाले. त्यानंतर 1970साली शिवसेनेतून धडाकेबाज कारकीर्द सुरू केलेल्या भुजबळ यांनी अनेक राजकीय चढ उतार पाहिले आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मुंबईचे महापौर पदही भूषविलं होतं. शिवसेनेतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छगन भुजबळ यांनी याआधीही गृह मंत्रीपद सांभाळलंय. गृहमंत्री असतानाच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं धाडस दाखवलं होतं. भुजबळांची वादळी कारकीर्द तेलगी प्रकरणामुळे काहीशी झाकोळली. मात्र यातून ते बाहेर आले. आणि आता पुन्हा एकदा ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदी विराजमान झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 10:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close