S M L

संघाचेही पुन्हा 'मंदिर वही बनायेंगे'

07 फेब्रुवारीअलाहाबादमध्ये कुंभ मेळ्यात सुरू असलेल्या धर्मसंसदेत संघ परिवारानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. राम मंदिराचा मुद्दा हा राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. या धर्मसंसदेत पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नावर आंदोलन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. राम मंदिर हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिक आहे. त्याला पुन्हा स्थापन करण्यास प्रयत्न करणार आहे. आम्हाला आता रावणासोबत युद्ध करावे लागणार आहे यासाठी जनशक्ती मिळवण्यासाठी आमच्याकडे माणसं आहे. यात कोणीसोबत असो वा नसो याच्याशी काहीही घेणं देणं नाही असंही भागवत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या हिंदू दहशतवादाच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणजे बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ सिंग कुंभमेळ्यात हजेरी लावली आणि गंगेत डुबकी मारली. यावेळी सिंग यांनीही राम मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता येत्या 12 तारखेला नरेंद्र मोदी कुंभ मेळ्यात येणार असून धर्म संसदेतही ते येणार आहेत. त्यामुळे 2014 ज्या निवडणुका लक्षात घेता भाजप-संघ पुन्हा एकदा 'बनायगें मंदिर'चा नारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 09:58 AM IST

संघाचेही पुन्हा 'मंदिर वही बनायेंगे'

07 फेब्रुवारी

अलाहाबादमध्ये कुंभ मेळ्यात सुरू असलेल्या धर्मसंसदेत संघ परिवारानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. राम मंदिराचा मुद्दा हा राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. या धर्मसंसदेत पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नावर आंदोलन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. राम मंदिर हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिक आहे. त्याला पुन्हा स्थापन करण्यास प्रयत्न करणार आहे. आम्हाला आता रावणासोबत युद्ध करावे लागणार आहे यासाठी जनशक्ती मिळवण्यासाठी आमच्याकडे माणसं आहे. यात कोणीसोबत असो वा नसो याच्याशी काहीही घेणं देणं नाही असंही भागवत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या हिंदू दहशतवादाच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणजे बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ सिंग कुंभमेळ्यात हजेरी लावली आणि गंगेत डुबकी मारली. यावेळी सिंग यांनीही राम मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता येत्या 12 तारखेला नरेंद्र मोदी कुंभ मेळ्यात येणार असून धर्म संसदेतही ते येणार आहेत. त्यामुळे 2014 ज्या निवडणुका लक्षात घेता भाजप-संघ पुन्हा एकदा 'बनायगें मंदिर'चा नारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close