S M L

औषध विक्रेत्यांना मनसेचा 'खळ्ळ फटॅक'चा इशारा

21 फेब्रुवारीअन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या धोरणाविरोधात राज्यातील मेडिकल दुकानं सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान उघडी ठेवण्याचा निर्णय औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं घेतला आहे. संघटनेच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. नियमानुसार काम करा आणि हे आंदोलन वेळीच आवरतं घ्या त्याचबरोबर पेशंन्टचे हाल थांबवा नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा मनसेनं दिला आहे. याबाबत मनसेतर्फे एक निवेदन अन्न आणि औषध प्रशासन विभागालाही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येईल अशी माहिती मनसे उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली आहेत. मेडिकल दुकानांमध्ये प्रशिक्षित फार्मसिस्टची उपस्थिती करणार्‍या एफडीएच्या नियमाविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांनी दिवसातून फक्त आठ तास काम आंदोलन पुकारले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यानच दुकान उघडे राहतील असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2013 01:12 PM IST

औषध विक्रेत्यांना मनसेचा 'खळ्ळ फटॅक'चा इशारा

21 फेब्रुवारी

अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या धोरणाविरोधात राज्यातील मेडिकल दुकानं सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान उघडी ठेवण्याचा निर्णय औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं घेतला आहे. संघटनेच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. नियमानुसार काम करा आणि हे आंदोलन वेळीच आवरतं घ्या त्याचबरोबर पेशंन्टचे हाल थांबवा नाहीतर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा मनसेनं दिला आहे. याबाबत मनसेतर्फे एक निवेदन अन्न आणि औषध प्रशासन विभागालाही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येईल अशी माहिती मनसे उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली आहेत. मेडिकल दुकानांमध्ये प्रशिक्षित फार्मसिस्टची उपस्थिती करणार्‍या एफडीएच्या नियमाविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांनी दिवसातून फक्त आठ तास काम आंदोलन पुकारले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यानच दुकान उघडे राहतील असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2013 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close