S M L

कांगारूंचे लोटांगण, भारताचा दणदणीत विजय

05 मार्चहैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दरम्यान खेळवण्यात आलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने बाजी मारली आहे. एक डाव आणि 135 रन्सनी भारतानं दुसरी टेस्ट जिंकली आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे बॅटसमन भारतीय स्पीनर्सपुढे टीकाव धरु शकले नाही. ऑस्ट्रेलियाचे फक्त चार बॅटसमन 2 अंकी धावसंख्या गाठू शकले. आर. आश्विननं 5 विकेट्स घेतल्या तर जडेजानं 3 विकेट्स घेतल्या आहे. तर ईशांत शर्मानं 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा सर्वांत भरवशाचा बॅट्समन मायक क्लार्कही फक्त 16 रन्सवर आऊट झाला. आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर जडेजा आणि आश्विननं कुठल्याही ऑस्ट्रेलियाचा बॅट्समनला पीचवर पाय रोवू दिले नाही. आणि फक्त 131 रन्सवर ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करत दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर धोणी भारताचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन ठरला आहे. त्याने गांगुलीचा 21 टेस्ट जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. धोणाीच्या नावावर आता सर्वाधिक 22 टेस्ट विजय आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2013 10:08 AM IST

कांगारूंचे लोटांगण, भारताचा दणदणीत विजय

05 मार्च

हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत दरम्यान खेळवण्यात आलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने बाजी मारली आहे. एक डाव आणि 135 रन्सनी भारतानं दुसरी टेस्ट जिंकली आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे बॅटसमन भारतीय स्पीनर्सपुढे टीकाव धरु शकले नाही. ऑस्ट्रेलियाचे फक्त चार बॅटसमन 2 अंकी धावसंख्या गाठू शकले. आर. आश्विननं 5 विकेट्स घेतल्या तर जडेजानं 3 विकेट्स घेतल्या आहे. तर ईशांत शर्मानं 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा सर्वांत भरवशाचा बॅट्समन मायक क्लार्कही फक्त 16 रन्सवर आऊट झाला. आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर जडेजा आणि आश्विननं कुठल्याही ऑस्ट्रेलियाचा बॅट्समनला पीचवर पाय रोवू दिले नाही. आणि फक्त 131 रन्सवर ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करत दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर धोणी भारताचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन ठरला आहे. त्याने गांगुलीचा 21 टेस्ट जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. धोणाीच्या नावावर आता सर्वाधिक 22 टेस्ट विजय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2013 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close