S M L

केंद्रेकरांच्या विरोधात तक्रार आमचीच:राष्ट्रवादी

21 फेब्रुवारीबीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याविरोधातली तक्रार आपल्याच आमदारांनी केल्याची कबुली राष्ट्रवादीनं दिली आहे. दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हाधिकारी विरोधा रिपोर्ट पाठवत असतील. चारा छावण्या निर्माण होऊ नये, पाण्याचे टँकर पोहचू नये अशी कामं जर कोणी करत असेल तर त्यांच्याविरोधात तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनीही बीडमध्येच हीच भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तक्रार केली आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकरांच्या बदलीच्या विरोधात आज बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. बीडची जनता आज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरली. केंद्रेकरांच्या बदलीच्या विरोधात. कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता जनतेनं उत्स्फुर्तपणे बंद पुकारला. प्रामाणिक जिल्हाधिकार्‍यांच्या मागे बीडची जनता खंबीरपणे उभी ठाकली आहेत. पण माजलगावमध्ये या उत्स्फुर्त बंदला हिंसक वळण लागलं. माजलगाव शहरात दोन एसटी बसेस फोडण्यात आल्या. जनतेबरोबरच आता राजपत्रीत अधिकार्‍यांचाही केंद्रेकरांना पाठिंबा मिळतोय. राजकीय दबावाखाली केंद्रेकरांची बदली करू नये अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी दिली.जिल्हाधिकारी सुनील केंद्रेंकरांना जनतेचा मिळणारा पाठिंबा बघून, प्रामाणिक अधिकार्‍यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावेल यात वाद नाही.केंद्रेकरांवर नाराजी कशासाठी ?- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - त्यामुळे आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज, अजित पवारांकडे बदलीची मागणी - शासकीय टँकरने पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर भर- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही- स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई - बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकारकेंद्रेकरांची बदली करण्यासाठी कोणत्या आमदारांनी दबाव टाकला ?- जयदत्त क्षीरसागरपालकमंत्री, बीड- प्रकाश सोळंकीमहसूल राज्यमंत्री- सुरेश धसआमदार- अमरसिंह पंडितआमदार- धनंजय मुंडे आमदार

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2013 01:39 PM IST

केंद्रेकरांच्या विरोधात तक्रार आमचीच:राष्ट्रवादी

21 फेब्रुवारी

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याविरोधातली तक्रार आपल्याच आमदारांनी केल्याची कबुली राष्ट्रवादीनं दिली आहे. दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हाधिकारी विरोधा रिपोर्ट पाठवत असतील. चारा छावण्या निर्माण होऊ नये, पाण्याचे टँकर पोहचू नये अशी कामं जर कोणी करत असेल तर त्यांच्याविरोधात तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनीही बीडमध्येच हीच भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तक्रार केली आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकरांच्या बदलीच्या विरोधात आज बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. बीडची जनता आज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरली. केंद्रेकरांच्या बदलीच्या विरोधात. कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता जनतेनं उत्स्फुर्तपणे बंद पुकारला. प्रामाणिक जिल्हाधिकार्‍यांच्या मागे बीडची जनता खंबीरपणे उभी ठाकली आहेत. पण माजलगावमध्ये या उत्स्फुर्त बंदला हिंसक वळण लागलं. माजलगाव शहरात दोन एसटी बसेस फोडण्यात आल्या. जनतेबरोबरच आता राजपत्रीत अधिकार्‍यांचाही केंद्रेकरांना पाठिंबा मिळतोय. राजकीय दबावाखाली केंद्रेकरांची बदली करू नये अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी दिली.जिल्हाधिकारी सुनील केंद्रेंकरांना जनतेचा मिळणारा पाठिंबा बघून, प्रामाणिक अधिकार्‍यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावेल यात वाद नाही.

केंद्रेकरांवर नाराजी कशासाठी ?

- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं - चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर - त्यामुळे आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज, अजित पवारांकडे बदलीची मागणी - शासकीय टँकरने पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर भर- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही- स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई - बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार

केंद्रेकरांची बदली करण्यासाठी कोणत्या आमदारांनी दबाव टाकला ?

- जयदत्त क्षीरसागरपालकमंत्री, बीड

- प्रकाश सोळंकीमहसूल राज्यमंत्री

- सुरेश धसआमदार

- अमरसिंह पंडितआमदार

- धनंजय मुंडे आमदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2013 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close