S M L

'त्या'मुलींवर बलात्कार झाला नाही

09 मार्चभंडारा बलात्कार आणि हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. फॉरेन्सिक अहवालात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं म्हटलं गेलं आहे. या तिन्ही मुलींचा मृत्यू हा विहिरीत पडून आणि बुडून झाल्याचं म्हटलं आहे. पण याअगोदर आलेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये या तिन्ही मुलींवर बलात्कार झाल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे या दोन्ही रिपोर्ट्समध्ये तफावत असल्याचं उघड होतंय. भंडार्‍यातल्या या प्रकरणाला 22 दिवस उलटून गेलेत पण या प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. अजूनही कोणाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी या मृत मुलींच्या आई आणि आजोबांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2013 12:11 PM IST

'त्या'मुलींवर बलात्कार झाला नाही

09 मार्च

भंडारा बलात्कार आणि हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. फॉरेन्सिक अहवालात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं म्हटलं गेलं आहे. या तिन्ही मुलींचा मृत्यू हा विहिरीत पडून आणि बुडून झाल्याचं म्हटलं आहे. पण याअगोदर आलेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये या तिन्ही मुलींवर बलात्कार झाल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे या दोन्ही रिपोर्ट्समध्ये तफावत असल्याचं उघड होतंय. भंडार्‍यातल्या या प्रकरणाला 22 दिवस उलटून गेलेत पण या प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. अजूनही कोणाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी या मृत मुलींच्या आई आणि आजोबांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2013 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close