S M L

मनसेचा विरोध झुगारत, फेरीवाल्यांचा मोर्चा

24 जानेवारीमनसेच्या इशार्‍याला न घाबरता फेरीवाल्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढला आहे. जवळपास 2 हजार फेरीवाले आझाद मैदानावर जमा झाले आहेत. एसीपी वसंत ढोबळे यांच्या कारवाईदरम्यान एका फेरीवाल्याचा हार्ट ऍटक आल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ आणि 2009 ची हॉकर्स पॉलिसी लागू करावी अशी मागणी करत आझाद हॉकर्स युनीयन या फेरीवाल्यांच्या संघटनेनं मोर्चा आयोजित केला आहे. पण या मोर्च्याच्या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीसांविरोधात मोर्चा काढू नका अन्यथा फेरीवाल्यांना मुंबईत व्यवसाय करू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे आजच्या मोर्च्यानंतर मनसे कार्यकर्ते काय करताय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मोर्च्यात मनसेबद्दल काहीही वक्तव्य करू नये अशी सक्त ताकीद पोलिसांनी आंदोलकांना दिली असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 10:48 AM IST

मनसेचा विरोध झुगारत, फेरीवाल्यांचा मोर्चा

24 जानेवारी

मनसेच्या इशार्‍याला न घाबरता फेरीवाल्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढला आहे. जवळपास 2 हजार फेरीवाले आझाद मैदानावर जमा झाले आहेत. एसीपी वसंत ढोबळे यांच्या कारवाईदरम्यान एका फेरीवाल्याचा हार्ट ऍटक आल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ आणि 2009 ची हॉकर्स पॉलिसी लागू करावी अशी मागणी करत आझाद हॉकर्स युनीयन या फेरीवाल्यांच्या संघटनेनं मोर्चा आयोजित केला आहे. पण या मोर्च्याच्या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीसांविरोधात मोर्चा काढू नका अन्यथा फेरीवाल्यांना मुंबईत व्यवसाय करू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे आजच्या मोर्च्यानंतर मनसे कार्यकर्ते काय करताय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मोर्च्यात मनसेबद्दल काहीही वक्तव्य करू नये अशी सक्त ताकीद पोलिसांनी आंदोलकांना दिली असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close