S M L

सातार्‍यात धुडगूस घालणारे 3 मनसेसैनिक अटकेत

05 मार्चसातार्‍यात सैनिक स्कूलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांचा समावेश आहे. ऍडमिशनसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केली होती. जिल्हा रुग्णालयात वयाचा दाखला मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. वय कमी दाखवून ऍडमिशन मिळवण्याचा परप्रांतीय प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. दरम्यान, या शाळेत परप्रांतीयांना 20 टक्के कोटा आहे. वयाचे दाखले चेक करूनच ऍडमिशन दिलं जातं, असं स्पष्टीकरण सातारा सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल कर्नल एस. ए. वर्धन यांनी दिलंय. तर झालेला प्रकार एकदा तपासून पाहावा लागेल पण परप्रांतीयांना जागा दिल्या जात असेल तर त्याला आपला विरोध असणारच असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2013 10:40 AM IST

सातार्‍यात धुडगूस घालणारे 3 मनसेसैनिक अटकेत

05 मार्च

सातार्‍यात सैनिक स्कूलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांचा समावेश आहे. ऍडमिशनसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केली होती. जिल्हा रुग्णालयात वयाचा दाखला मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. वय कमी दाखवून ऍडमिशन मिळवण्याचा परप्रांतीय प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. दरम्यान, या शाळेत परप्रांतीयांना 20 टक्के कोटा आहे. वयाचे दाखले चेक करूनच ऍडमिशन दिलं जातं, असं स्पष्टीकरण सातारा सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल कर्नल एस. ए. वर्धन यांनी दिलंय. तर झालेला प्रकार एकदा तपासून पाहावा लागेल पण परप्रांतीयांना जागा दिल्या जात असेल तर त्याला आपला विरोध असणारच असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2013 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close