S M L

नाशिक-पुणे, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गांची घोषणा

13 मार्चरेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा झाली नव्हती त्यानंतर सर्वपक्षीय खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रेल्वे बजेटवरील चर्चेत रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी महाराष्ट्राची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात नाशिक - पुणे असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तसेच धुळे-मालेगाव मार्गे मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली. तर एमयूटीपीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी 14, 660 कोटींपैकी केंद्र 50 टक्के खर्च करणार आहे. तसंच मुंबई - वेलंकनी व्हाया चेन्नई ही दररोज चालणारी गाडी तर नागपूर- अजमेर या आठवड्यातून दोन वेळा चालणार्‍या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या चर्चेत महाराष्ट्रासाठी काही मोठ्या घोषणा होतील अशी आशा होती पण एक दोन घोषणा वगळता महाराष्ट्राची मोठी निराशा झालीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 09:45 AM IST

नाशिक-पुणे, मनमाड-इंदूर रेल्वे मार्गांची घोषणा

13 मार्च

रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा झाली नव्हती त्यानंतर सर्वपक्षीय खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रेल्वे बजेटवरील चर्चेत रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी महाराष्ट्राची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात नाशिक - पुणे असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तसेच धुळे-मालेगाव मार्गे मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली. तर एमयूटीपीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी 14, 660 कोटींपैकी केंद्र 50 टक्के खर्च करणार आहे. तसंच मुंबई - वेलंकनी व्हाया चेन्नई ही दररोज चालणारी गाडी तर नागपूर- अजमेर या आठवड्यातून दोन वेळा चालणार्‍या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या चर्चेत महाराष्ट्रासाठी काही मोठ्या घोषणा होतील अशी आशा होती पण एक दोन घोषणा वगळता महाराष्ट्राची मोठी निराशा झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2013 09:45 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close