S M L

दाभोळ वीज प्रकल्प पडला बंद, लोडशेडिंगची शक्यता

07 फेब्रुवारीरत्नागिरी येथील दाभोळच्या आरजीपीपीएल (RGPPL)मधून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली आहे. कृष्णा गोदावरी बेसिनमधून प्रकल्पाला होणार्‍या गॅस पुरवठ्यात कमालीची घट झाल्यामुळे दाभोळ वीज प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून रिलायन्सकडून या प्रकल्पाला मिळणार्‍या गॅस पुरवठ्यात सातत्याने घट होत जाऊन हा पुरवठा 0.86 MMSCMD वर आला. त्यामुळे 2 हजार मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प कालपर्यंत फक्त 200 मेगावॅट विजनिर्मितीवर आला होता. पण आता ही वीजनिर्मिती सुध्दा बंद पडल्यामुळे महावितरणला इतर राज्यांकडून जादा वीज खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा राज्यातल्या काही भागांना पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 10:26 AM IST

दाभोळ वीज प्रकल्प पडला बंद, लोडशेडिंगची शक्यता

07 फेब्रुवारी

रत्नागिरी येथील दाभोळच्या आरजीपीपीएल (RGPPL)मधून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली आहे. कृष्णा गोदावरी बेसिनमधून प्रकल्पाला होणार्‍या गॅस पुरवठ्यात कमालीची घट झाल्यामुळे दाभोळ वीज प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून रिलायन्सकडून या प्रकल्पाला मिळणार्‍या गॅस पुरवठ्यात सातत्याने घट होत जाऊन हा पुरवठा 0.86 MMSCMD वर आला. त्यामुळे 2 हजार मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प कालपर्यंत फक्त 200 मेगावॅट विजनिर्मितीवर आला होता. पण आता ही वीजनिर्मिती सुध्दा बंद पडल्यामुळे महावितरणला इतर राज्यांकडून जादा वीज खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा राज्यातल्या काही भागांना पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close