S M L

डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमारांचं बेमुदत उपोषण

22 जानेवारीऑईल कंपन्यांनी डिझेल दरात केलेल्या अचानक वाढीच्या निषेधार्थ कोकणातील मच्छीमारांचा उद्रेक वाढत चालला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मासेमारी ठप्प झाली असून सिंधुदुर्गातील मच्छीमारांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. सर्व मच्छीमार सोसायट्यांनी वाढीव दराची डिझेल खरेदी बंद केली आहे. याबाबत केंद्रीय कृषी आणि मत्स्य व्यवसाय मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज पुन्हा एकदा भेट घेतली. दोन दिवसात या समस्येवर तोडगा निघाला नाही तर सिंधुदुर्ग ते ठाणेपर्यंतचे सर्व मच्छीमार एकत्र येतील आणि उग्र आंदोलन करतील असा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 09:52 AM IST

डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमारांचं बेमुदत उपोषण

22 जानेवारी

ऑईल कंपन्यांनी डिझेल दरात केलेल्या अचानक वाढीच्या निषेधार्थ कोकणातील मच्छीमारांचा उद्रेक वाढत चालला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मासेमारी ठप्प झाली असून सिंधुदुर्गातील मच्छीमारांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. सर्व मच्छीमार सोसायट्यांनी वाढीव दराची डिझेल खरेदी बंद केली आहे. याबाबत केंद्रीय कृषी आणि मत्स्य व्यवसाय मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज पुन्हा एकदा भेट घेतली. दोन दिवसात या समस्येवर तोडगा निघाला नाही तर सिंधुदुर्ग ते ठाणेपर्यंतचे सर्व मच्छीमार एकत्र येतील आणि उग्र आंदोलन करतील असा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close