S M L

अजित पवारांनी मराठवाड्याच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली-मुंडे

01 फेब्रुवारीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातल्या जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचं काम केलंय असा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. सरकारला दुष्काळ केवळ पश्चिम महाराष्ट्रातच दिसतो. त्यामुळेच पश्चिम महाराष्टात 480 कोटींचा निधी चारा डेपोसाठी देण्यात आला आणि मराठवाड्याला केवळ 10 कोटी रुपये देण्यात आलेत. अजित पवार यांनी औरंगाबाद इथल्या दुष्काळाच्या बैठकीत सांगितले की 1 हजार कोटी रुपये मराठवाड्यासाठी अधिकचे देऊ मात्र हा निधी जिल्हा नियोजनात प्रत्येक जिल्ह्याला मिळत असतो. हा निधी पुढील वर्षी मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम केलंय. मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्यासाठी अधिकचे 2 हजार कोटी रुपये शासनाने द्यावेत अशी मागणी गोपीनाथ मुंढे यांनी तुळजापूर इथं केली .

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2013 02:05 PM IST

अजित पवारांनी मराठवाड्याच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली-मुंडे

01 फेब्रुवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातल्या जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचं काम केलंय असा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. सरकारला दुष्काळ केवळ पश्चिम महाराष्ट्रातच दिसतो. त्यामुळेच पश्चिम महाराष्टात 480 कोटींचा निधी चारा डेपोसाठी देण्यात आला आणि मराठवाड्याला केवळ 10 कोटी रुपये देण्यात आलेत. अजित पवार यांनी औरंगाबाद इथल्या दुष्काळाच्या बैठकीत सांगितले की 1 हजार कोटी रुपये मराठवाड्यासाठी अधिकचे देऊ मात्र हा निधी जिल्हा नियोजनात प्रत्येक जिल्ह्याला मिळत असतो. हा निधी पुढील वर्षी मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम केलंय. मराठवाड्यातील दुष्काळ निवारण्यासाठी अधिकचे 2 हजार कोटी रुपये शासनाने द्यावेत अशी मागणी गोपीनाथ मुंढे यांनी तुळजापूर इथं केली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2013 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close