S M L

'एक आमदार जरी मनसेत गेला तर सत्कार करू'

29 जानेवारीशिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नाही,शिवसेना मजबूत आहे आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही शिवसेना यापुढेही बाळासाहेबांच्या मार्गानंच पुढे जाईल, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय वाटचालीबाबत भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची दिशा, धोरणे आणि योजना स्पष्ट केल्यात. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मनसेलाही चोख उत्तर दिलंय. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या वाटेला जाऊ नका. त्यांचे कन्नडचे आमदार बाहेर पडले ते काय म्हणाले त्यांच्याविषयी ? 40 काय चारशे घेऊन जा म्हणा. एक जरी आला तर तुमचा जाहीर सत्कार करीन. मुळात ते स्वत: आनंदात आहेत काय? स्वत: विकाऊ म्हणून दुनिया विकाऊ होत नाहीय. शिवसैनिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करु नका असं आव्हानही ठाकरे यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 09:26 AM IST

'एक आमदार जरी मनसेत गेला तर सत्कार करू'

29 जानेवारी

शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नाही,शिवसेना मजबूत आहे आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही शिवसेना यापुढेही बाळासाहेबांच्या मार्गानंच पुढे जाईल, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय वाटचालीबाबत भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची दिशा, धोरणे आणि योजना स्पष्ट केल्यात. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मनसेलाही चोख उत्तर दिलंय. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या वाटेला जाऊ नका. त्यांचे कन्नडचे आमदार बाहेर पडले ते काय म्हणाले त्यांच्याविषयी ? 40 काय चारशे घेऊन जा म्हणा. एक जरी आला तर तुमचा जाहीर सत्कार करीन. मुळात ते स्वत: आनंदात आहेत काय? स्वत: विकाऊ म्हणून दुनिया विकाऊ होत नाहीय. शिवसैनिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करु नका असं आव्हानही ठाकरे यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close