S M L

महिला दिनानिमित्त महिला धोरणाचा मसुदा होणार जाहीर

07 मार्चउद्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिसर्‍या महिला धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मसुद्यावर 2 महिन्यांत लोकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. उद्या पुण्यात बालेवाडीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हा मसुदा सादर करण्यात येईल. त्याचवेळी तो मसुदा सरकारी वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. यापूर्वी 1994 मध्ये पहिलं, 2001 मध्ये दुसरं महिला धोरण जाहीर केलं होतं. महिला धोरणातील काही ठळक शिफारसी पुढीलप्रमाणे आहेत1. विवाहित महिलेला पतीचं किंवा वडिलांचं नाव लावण्याची सक्ती करता येणार नाही अशी सक्ती करणार्‍यावर कारवाई करण्याची शिफारस या धोरणात करण्यात आली आहे.2. मुलाला किंवा मुलीला फक्त आईचं लाव लावण्याची मुभा या तरतुदीचा रकाना सरकारी दस्तावेजामध्ये असावा अशी सूचना3. तंटामुक्ती गाव या योजनेत महिलांवरील अत्याचार्‍याच्या गुन्ह्यांचा समावेश करू नये4. गर्भवती महिलेबरोबरच तिच्या पतीचीही HIV चाचणी बंधनकारक करावी अशी सूचना5. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण सक्तीचं असावं

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2013 10:21 AM IST

महिला दिनानिमित्त महिला धोरणाचा मसुदा होणार जाहीर

07 मार्च

उद्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिसर्‍या महिला धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मसुद्यावर 2 महिन्यांत लोकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. उद्या पुण्यात बालेवाडीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हा मसुदा सादर करण्यात येईल. त्याचवेळी तो मसुदा सरकारी वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. यापूर्वी 1994 मध्ये पहिलं, 2001 मध्ये दुसरं महिला धोरण जाहीर केलं होतं.

महिला धोरणातील काही ठळक शिफारसी पुढीलप्रमाणे आहेत

1. विवाहित महिलेला पतीचं किंवा वडिलांचं नाव लावण्याची सक्ती करता येणार नाही अशी सक्ती करणार्‍यावर कारवाई करण्याची शिफारस या धोरणात करण्यात आली आहे.2. मुलाला किंवा मुलीला फक्त आईचं लाव लावण्याची मुभा या तरतुदीचा रकाना सरकारी दस्तावेजामध्ये असावा अशी सूचना3. तंटामुक्ती गाव या योजनेत महिलांवरील अत्याचार्‍याच्या गुन्ह्यांचा समावेश करू नये4. गर्भवती महिलेबरोबरच तिच्या पतीचीही HIV चाचणी बंधनकारक करावी अशी सूचना5. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण सक्तीचं असावं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2013 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close