S M L

दुष्काळ निवारण्यासाठी 1207 कोटींची मदत

13 मार्चदिल्ली : केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 1207 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 807 कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी तर 400 कोटी रुपये रब्बी पिक वाचवण्यासाठी देण्यात आले आहेत. खरीप पिकांसाठी यापूर्वीच 778 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्याने केंद्राकडे 1800 कोटींची मागणी केली होती. जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना यापुढेही मदत केली जाईल. मोठ्या जनावारांना आता रोज प्रत्येकी 50 तर लहान जनावरांना 25 रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. दुष्काळामध्ये फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे 2 हेक्टर फळबागा धारकांना प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिले जाणार आहे. केंद्राच्या टीमने पाहणी केल्यानंतर अहवाल दिला. त्यानंतर मदत ठरवण्यात आली, असं पवारांनी सांगितलं. विरोधकांनी मात्र केंद्राच्या या निर्णयावर टीका केली असून सरकारने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका भाजपनं केली. सध्याच्या दुष्काळाची तुलना 1972 च्या दुष्काळाशी केली जातेय. पण, तेव्हा रोज 45 लाख लोकांना मदत केली जात होती तर यंदा हा आकडा रोज 3 लाख लोक इतका कमी झालाय असं शरद पवारांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 10:00 AM IST

दुष्काळ निवारण्यासाठी 1207 कोटींची मदत

13 मार्च

दिल्ली : केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 1207 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 807 कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी तर 400 कोटी रुपये रब्बी पिक वाचवण्यासाठी देण्यात आले आहेत. खरीप पिकांसाठी यापूर्वीच 778 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्याने केंद्राकडे 1800 कोटींची मागणी केली होती. जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना यापुढेही मदत केली जाईल. मोठ्या जनावारांना आता रोज प्रत्येकी 50 तर लहान जनावरांना 25 रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. दुष्काळामध्ये फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे 2 हेक्टर फळबागा धारकांना प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिले जाणार आहे. केंद्राच्या टीमने पाहणी केल्यानंतर अहवाल दिला. त्यानंतर मदत ठरवण्यात आली, असं पवारांनी सांगितलं. विरोधकांनी मात्र केंद्राच्या या निर्णयावर टीका केली असून सरकारने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका भाजपनं केली. सध्याच्या दुष्काळाची तुलना 1972 च्या दुष्काळाशी केली जातेय. पण, तेव्हा रोज 45 लाख लोकांना मदत केली जात होती तर यंदा हा आकडा रोज 3 लाख लोक इतका कमी झालाय असं शरद पवारांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2013 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close