S M L

दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

02 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. दानिश शेख असं त्याचं नाव आहे. दानिश हा काँग्रेस नगरसेवक मुजफ्फर शेख यांचा पुतण्या आहे. तो गेल्या आठवड्यापासून फरार होता. संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या आरोपींच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न, दंगल भडकवणे आणि दलित अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2013 10:18 AM IST

दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

02 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. दानिश शेख असं त्याचं नाव आहे. दानिश हा काँग्रेस नगरसेवक मुजफ्फर शेख यांचा पुतण्या आहे. तो गेल्या आठवड्यापासून फरार होता. संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या आरोपींच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न, दंगल भडकवणे आणि दलित अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2013 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close