S M L

होन्डा कंपनी फॉर्म्युला वन टीम विकण्याच्या विचारात

5 डिसेंबर जागतिक मंदीचा फटका सध्या सगळ्यांनाच बसतोय. त्याला फॉर्म्युला वन रेसिंग स्पर्धासुदधा अपवाद राहिलेली नाही. फॉर्म्युला वनची टीम होन्डानं फॉर्म्युला वनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. होन्डा मोटर्सच्या अध्यक्षांच्यामते जानेवारी 2009 पर्यंत होन्डा कंपनी आपली फॉर्म्युला वन टीम विकण्याच्या विचारात आहे. होन्डा कंपनीला त्यांची फॉर्म्युला वन टीम चालवायला दरवर्षी अंदाजे 1600 कोटी रुपये खर्च येतो. टीम बॉस रॉस ब्राऊन आणि निक फ्रे हे टीमच्या पुढील योजनांबद्दल लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. 2008 च्या सिझनमध्ये जेनसन बटन आणि रुबेन्स बॅरिकेलो हे होन्डाचे ड्रायव्हर्स होते. तर आता 2009 च्या सिझनमध्ये बॅरिकेलोनं निवृत्ती घेतल्यानंतर ब्रुनो सेन्ना बॅरिकेलोची जागा घेणार आहे. होन्डाच्या या घोषणेनंतर फॉर्म्युला वन जगतात अनेक जणांना धक्का लागला असला तरी होन्डासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 2007 च्या सिझनमध्ये होन्डा टीमनं सर्वात जास्त खर्च केला होता. पण इतका खर्च करूनही होन्डाला आत्तापर्यंत 1967 पासून फक्त एकच रेस जिंकता आली आहे. 2006 मध्ये जेनसन बटननं हंगेरियन ग्रॅण्ड प्री जिंकत होन्डाला हे एकमेव यश मिळवून दिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 03:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close