S M L

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

02 फेब्रुवारीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीनंतर या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. या बैठकीत मोदींच्या नावाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या आधीही राम जेठमलानी, यशवंत सिंन्हा यांच्यासह काही नेत्यांनी मोदींचं नाव घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र जेडीयुचा याला विरोध आहे. दरम्यान, मोदींचं नाव थेट पंतप्रधानपदासाठी घोषित न करता त्यांना प्रचार समितीचं प्रमुखपद देवून मोदींचा राष्ट्रीय पातळीवर प्रवेश घडवून आणावा, असंही काही भाजप नेत्यांचं मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 09:43 AM IST

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

02 फेब्रुवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीनंतर या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. या बैठकीत मोदींच्या नावाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या आधीही राम जेठमलानी, यशवंत सिंन्हा यांच्यासह काही नेत्यांनी मोदींचं नाव घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र जेडीयुचा याला विरोध आहे. दरम्यान, मोदींचं नाव थेट पंतप्रधानपदासाठी घोषित न करता त्यांना प्रचार समितीचं प्रमुखपद देवून मोदींचा राष्ट्रीय पातळीवर प्रवेश घडवून आणावा, असंही काही भाजप नेत्यांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close