S M L

बिल्डरविरोधात नागरिकांचं तीव्र आंदोलन

07 मार्चमुंबईत गोळीबार नगर येथे शिवालिक बिल्डरविरोधात नागरिकांचं आंदोलन आज अधिक तीव्र झालं. शिवालिक बिल्डर, पोलीस आणि प्रशासनाला घेऊन आले असता नागरिकांनी विरोध केला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर याही या लढ्यात उतरल्या आहेत. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचं लक्षातच येताच पोलिसी बळाचा वापर करत मेधा पाटकर यांच्यासहित काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवालिक बिल्डर येथे सव्वाशे एकरवर एसआरए अंतर्गत घर बांधून देणार आहे. यात 26 हजार 500 नागरिक आहेत. मात्र यात कागदोपत्रीही योग्य आणि निमानुसार काम व्हायला हवं अशी मागणी नागरिक करत आहेत. तसंच घर तयार होण्याच्या काळात आपल्याला योग्य ठिकाणी पर्यायी घरं मिळावीत अशीही नागरिकांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2013 12:57 PM IST

बिल्डरविरोधात नागरिकांचं तीव्र आंदोलन

07 मार्च

मुंबईत गोळीबार नगर येथे शिवालिक बिल्डरविरोधात नागरिकांचं आंदोलन आज अधिक तीव्र झालं. शिवालिक बिल्डर, पोलीस आणि प्रशासनाला घेऊन आले असता नागरिकांनी विरोध केला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर याही या लढ्यात उतरल्या आहेत. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचं लक्षातच येताच पोलिसी बळाचा वापर करत मेधा पाटकर यांच्यासहित काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवालिक बिल्डर येथे सव्वाशे एकरवर एसआरए अंतर्गत घर बांधून देणार आहे. यात 26 हजार 500 नागरिक आहेत. मात्र यात कागदोपत्रीही योग्य आणि निमानुसार काम व्हायला हवं अशी मागणी नागरिक करत आहेत. तसंच घर तयार होण्याच्या काळात आपल्याला योग्य ठिकाणी पर्यायी घरं मिळावीत अशीही नागरिकांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2013 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close