S M L

'एनसीटीसी'वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

25 फेब्रुवारीएनसीटीसी (NCTC) अर्थात राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राबद्दल वाद निर्माण झाला आहे. हैदराबाद इथं झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एनसीटीसी लवकरात लवकर स्थापन व्हावं यासाठी हालचाल सुरु केली. तर भाजपाने मात्र काँग्रेस याविषयावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत गुप्तचर यंत्रणांना अटक करण्याचे थेट अधिकार नसतात अशी टीका भाजपने केली आहे. एनसीटीसीला अनेक राज्य सरकारांनी विरोध केल्याच्या मुद्द्याकडेही भाजपने काँग्रेसचं लक्ष्य वेधलंय. एनसीटीसीची स्थापना करण्यासंदर्भात आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोललो असून त्यांनी एनसीटीसीला पाठिंबा दर्शवलाय असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2013 09:45 AM IST

'एनसीटीसी'वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

25 फेब्रुवारी

एनसीटीसी (NCTC) अर्थात राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राबद्दल वाद निर्माण झाला आहे. हैदराबाद इथं झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एनसीटीसी लवकरात लवकर स्थापन व्हावं यासाठी हालचाल सुरु केली. तर भाजपाने मात्र काँग्रेस याविषयावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत गुप्तचर यंत्रणांना अटक करण्याचे थेट अधिकार नसतात अशी टीका भाजपने केली आहे. एनसीटीसीला अनेक राज्य सरकारांनी विरोध केल्याच्या मुद्द्याकडेही भाजपने काँग्रेसचं लक्ष्य वेधलंय. एनसीटीसीची स्थापना करण्यासंदर्भात आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोललो असून त्यांनी एनसीटीसीला पाठिंबा दर्शवलाय असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2013 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close