S M L

गडचिरोलीतील IRB बटालियन कोल्हापूरला हलवली

08 फेब्रुवारीगडचिरोली जिल्ह्यात कार्यरत बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन (IRB) काढून त्याची रवानगी कोल्हापुरात केल्याने गडचिरोलीतील सुशीक्षित तरुणांमध्ये नाराजी आहे. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनच्या तुकड्या काढून त्याऐवजी इंडियन रिझर्व्ह बटालियन अर्थात आयआरबीच्या 35 बटालियन्स स्थापन करण्यात येतील. त्यातल्या दोन आयआरबी महाराष्ट्रात स्थापन होतील असं तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी डिसेंबर 2011 मध्ये स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आयआरबीची एक बटालियन गोंदियाला तर दुसरी गडचिरोलीला स्थापन करण्याचा मूळ प्रस्ताव होता. पण गडचिरोलीची बटालियन कोल्हापुरात हलवली गेली. ही 80 टक्के केंद्राच्या अर्थसहाय्याने स्थापन होत असलेली बटालियन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्नपूर्वक कोल्हापूरला हलवल्याची चर्चा आहे. आता या बटालियनसाठी पुण्यात भरती होतेय. त्यासाठी गडचिरोलीच्या इच्छुक तरुणांना पुण्याला जावं लागतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2013 05:06 PM IST

गडचिरोलीतील IRB बटालियन कोल्हापूरला हलवली

08 फेब्रुवारी

गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन (IRB) काढून त्याची रवानगी कोल्हापुरात केल्याने गडचिरोलीतील सुशीक्षित तरुणांमध्ये नाराजी आहे. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनच्या तुकड्या काढून त्याऐवजी इंडियन रिझर्व्ह बटालियन अर्थात आयआरबीच्या 35 बटालियन्स स्थापन करण्यात येतील. त्यातल्या दोन आयआरबी महाराष्ट्रात स्थापन होतील असं तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी डिसेंबर 2011 मध्ये स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आयआरबीची एक बटालियन गोंदियाला तर दुसरी गडचिरोलीला स्थापन करण्याचा मूळ प्रस्ताव होता. पण गडचिरोलीची बटालियन कोल्हापुरात हलवली गेली. ही 80 टक्के केंद्राच्या अर्थसहाय्याने स्थापन होत असलेली बटालियन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्नपूर्वक कोल्हापूरला हलवल्याची चर्चा आहे. आता या बटालियनसाठी पुण्यात भरती होतेय. त्यासाठी गडचिरोलीच्या इच्छुक तरुणांना पुण्याला जावं लागतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2013 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close