S M L

यंदाची नॅशनल स्पर्धा गाजवली सायली राणेने.

5 डिसेंबर ठाणेऋजुता सटवे चंदीगड इथं झालेली बॅडमिंटनची सबज्युनिअर नॅशनल स्पर्धा यंदा गाजवली ती ठाण्याच्या सायली राणेने.मुलींच्या गटात तर तिने विजेतपद पटकावलंच शिवाय तन्वी लाडच्या साथीने डबल्समध्येही तिने बाजी मारली.आपल्या जोरदास शॉट्सने तिने बॅडमिंटनमधल्या भारतातल्या टॉपच्या खेळाडूंना खूश केलंय.एकदा का ती बॅडमिंटन कोर्टवर उतरली की तिचा आवेश बघण्यासारखा असतो. दोनच दिवसांपूर्वी ती चंदीगड इथं नॅशनल स्पर्धा खेळून परतलीय. आणि तिथं मिळालेल्या दुहेरी यशामुळे आपल्या खेळावर ती खूश आहे. एका वर्षापूर्वी सायली दुखापतीमुळे बेजार झाली होती. खेळ सोडून द्यायचा विचारही तिच्या मनात आला.पण कोच मयूर धामणेकर आणि श्रीकांत वाड यांच्या पाठिंब्यामुळे ती पुन्हा कोर्टवर उतरली. आणि पुण्यात झालेल्या एका स्पर्धेत टॉप सिडेड नेहा पंडितला हरवण्याची किमयाही तिने केली.सातत्य हा सायलीच्या खेळाचा सगळयात मोठा गुण आहे. पाच वर्षांपूर्वी ती प्रोफेशनल बॅडमिंटन खेळायला लागली. आणि तेव्हापासून ज्युनिअर आणि सब ज्युनिअर गटात ती पहिल्या पाच खेळाडूमध्ये आहे.सायली आता फक्त 16 वर्षांची आहे. आणि बॅडमिंटनमध्ये पुढची वाटचाल करण्यासाठी तिला गरज आहे ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवाची. तिच्यातली गुणवत्ता हेरुन ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे आणि सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तिला आवश्यक आर्थिक मदतही देऊ केली आहे. त्यामुळे सायलीने आता लक्ष केंद्रीत केलंय आशियाई स्तरावरच्या स्पर्धांवर.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 04:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close